डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कॅनडा सरकारकडून असाही सन्मान एप्रिल महिना कॅनडात दलित हिस्ट्री महिना म्हणून जाहिर

कधीकाळी कॅनडा हा देश ही ब्रिटीश वसाहतीचा भाग होता. तसेच ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठ हा कॅनडाचा भाग आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांच्या उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापाठात प्रवेश घेतला होता. आणि त्या विद्यापीठाची पदवीही कमी कालावधीत घेतली होती. त्यामुळे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती एप्रिल महिन्यात येत असल्याने हा संपूर्ण महिना दलित हिस्ट्री महिना म्हणून कॅनडा सरकारकडून जाहिर करण्यात आले आहे.

ब्रिटीश कोलंबिया प्रांताकडून जाहिर करण्यात आलेल्या पत्रकानुसार आदीवासी लोक, ब्लॅक लोक आणि ब्रिटीश कोलंबियातील काही लोक असे सर्वच प्रकारचे लोक रहात आले आहे आहेत. परंतु आम्ही या सर्वांससोबत वर्ण द्वेषी लोकांकडून वर्ण भेद, भेदाभेद, आदी गोष्टी पहात आले आहे. या सर्व गोष्टींना ब्रिटीश कोलंबिया प्रांताकडून वारंवार प्रत्युत्तरही देण्यात येत आहे.

दरम्यान, दलित समुदायाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला एप्रिल महिना आता सुरु होत आहे. दलित समुदायाच्या कल्याणासाठी जे समाजसुधारकांचा जन्म झाला किंवा त्यांचा मृत्यू झाला ते सर्वांची जयंती आणि पुण्यातिथी एप्रिल महिन्यातच येत आहे. जसे की डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, मंगूराम मंगोवालिया आणि संत राम उदासी आदी जणांची पुण्यतिथी आणि जयंती याच महिन्यात येते.

दलित समुदांयाची क्षमता ब्रिटीश कोलंबिया प्रांत जाणून आहे. तसेच दलित समुदायासोबत झालेल्या अन्यायाची जाणीवही आहे. त्यामुळे दलित समुदायाला आपल्या संघर्षाचा काळाचा गौरव आणि समाज सुधारकांच्या ऋण फेडण्यासाठी म्हणून ब्रिटीश कोलंबिया प्रांताकडून एप्रिल महिना हा दलित हिस्ट्री मंथ- अर्थात दलित इतिहासाचा महिना म्हणून जाहिर केले आहे. तसेच यासंदर्भात लेफ्टनंट गर्व्हनर वेन्डी कोचिया आणि प्रभारी अटर्नी जनरल यांच्या सहिने दलित हिस्ट्री मंथ महिनाचे पत्रकही जारी केले आहे.

About Editor

Check Also

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनानिमित्त खास लेख

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत १९०५ ते १९५६ असे सतत पाच दशके ज्यांनी समाज सुधारणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *