१.५० लाख राजपत्रित अधिकाऱ्यांकडून पूरग्रस्तांसाठी एकदिवसाचा पगार थेट पगारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे शासनास विनंती

मुंबईः प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आलेल्या महापूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांना जनतेचे सेवक या नात्याने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागातील कार्यरत राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने तसे पत्र राज्य शासनास दिले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधूदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीत राज्यातील जनतेबरोबर शासनाचे सर्व अधिकारी आहेत. सामाजिक बांधीलकेतून पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ऑगस्ट महिन्याच्या पगारातून ही रक्कम परस्पर कपात करून ती थेट मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करावी अशी विनंतीही महासंघाने शासनास केली आहे.

About Editor

Check Also

१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकाऱाचा पहिल्यांदा प्रश्न मांडला

आधुनिक अर्थव्यवस्थेत ग्राहक हा केंद्रबिंदू मानला जातो. बाजारपेठेत वस्तू आणि सेवा तयार करणारे उत्पादक, व्यापारी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *