सामाजिक

२५२ तृतीयपंथीयांना घरे मिळणार घरे

नागपूर सुधार प्रन्यासने बांधलेली २५२ घरे तृतीयपंथीयांना देण्यात येणार असून त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाला दिले. सामाजिक न्याय विभागाने नागपूरच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशात तृतीयपंथीयांना घरे देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, यापुढे मैला उपसण्यासाठी …

Read More »

संभाजी भिडेंचे अजब तर्कट, महिला पत्रकाराला म्हणाले आधी टिकली लावा …

आपल्या आचरट वक्तव्याने नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे आणि आपल्या मानसिकतेची कुवत दाखविणारे संभाजी भिडे यांनी आज थेट महिला पत्रकारास टिकली लावली तरच बोलेन असे वक्तव्य करत महिला पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करत पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला. संभाजी भिडे हे आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. …

Read More »

वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार

आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर …

Read More »

याला काय अर्थ आहे साने…आता मला हेलिकॉप्टरमध्ये कोण बसवणार?

मी ही गोष्ट लिहित असताना आपले संजीव साने अनंतात विलिन होत असतील…! २००९ सालची ही गोष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना-भाजपाची युती झाली होती. मात्र, तेव्हाच महाराष्ट्रात एक आगळावेगळा प्रयोग केला गेला. राज्यातील सगळे डावे पक्ष, सगळे आरपीआय गट आणि …

Read More »

कर्नाटकातील ‘त्या’ साधूची आत्महत्या हनी ट्रॅपमुळे

काही वर्षांपूर्वी इंदौरचे अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज हे ही एका हमी ट्रॅपमध्ये आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची बाब कालांतराने उघडकीस आली. त्यानंतर अगदी तशीच घटना कर्नाटकात घडल्याचे सांगण्यात येत असून ४५ वर्षीय लिंगायत साधू बसवलिंगा स्वामी यांनी ही याच प्रकारातून आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आले आहे. कर्नाटकमधील ४५ वर्षीय लिंगायत साधू …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थीना मानधन केव्हा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थीना दरमहा मानधन मिळण्याबाबतचा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून वित्त विभाग, आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून वित्त विभागाकडे सादर करावा. असे निर्देश तत्कालीन ठाकरे मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले होते, आज वर्षे होऊन गेले. तरी हा प्रस्ताव …

Read More »

आदिवासींना रोजगार उपलब्ध करून स्थलांतराचा प्रश्न सोडवणार

‘आदिवासींच्या शिक्षण, आरोग्य व उपजीविका या तीन महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. आदिवासींच्या स्थलांतराचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार’, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. आज आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय संकुल विकास क्षेत्रातील आदिवासी …

Read More »

कॉम्रेड कुमार शिराळकर : एक मौल्यवान अष्टपैलू हिरा शिराळकर यांच्या निधनानिमित्त कॉ. डॉ. अशोक ढवळे लिहिलेला खास लेख

कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्या जाण्याने केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नव्हे, तर महाराष्ट्राच्या समग्र डाव्या आणि परिवर्तनवादी चळवळीने एक मौल्यवान अष्टपैलू हिरा गमावला आहे. गेल्या ४० वर्षांचा एक सच्चा कॉम्रेड आणि मित्र मी गमावला आहे. वर्गसंघर्षातून क्रांतिकार्याकडे विधायक कार्यातून क्रांतिकारक कार्याकडे झालेल्या कुमार यांच्या प्रवासातून त्यांची संवेदनशीलता आणि अन्याय्य व्यवस्थेबद्दलची चीड …

Read More »

१० वर्षानंतर प्रा.साईबाबा यांच्यासह इतर जण निर्दोष मुक्त नक्षलवादी चळवळीशी संबध असल्याचा होता ठपका

नक्षलवादी चळवळीशी संबध सहभागी असल्याचा ठपका ठेवत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक प्रा.जी.एन.साईबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे जवळपास १० वर्षे साईबाबा यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेला नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा व …

Read More »

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने कमावली १४० पदके महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री महाजन म्हणाले, या घ‌वघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. …

Read More »