सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे नाटक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले

राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाट्य विभाग अर्थात ललित कला केंद्राकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही विभागप्रमुख डॉ प्रविण भोळे यांच्या परवानगीने रामायणातील आधारीत नाट्य सादर करण्यात येत होते. मात्र रामायणातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद आणि दृष्य दाखविल्याच्या निषेधार्थ अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडत ललित कला केंद्राची तोडफोड केल्याची घटना आज घडली.

तत्पूर्वी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी डॉ प्रविण भोळे यांच्यासह ६ जणांना अटक केल्याची माहिती पुढे आली.

यासंदर्भात परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्याशी काही माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी रामायणातील व्यक्तीरेखांवर नाटक सादर केले. या नाटकात भावना दुखावणारे काही संवाद होते. याप्रकरणी पोलिसांनी डॉ प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक केल्याची माहिती दिली.

पुढे बोलताना पोलिस उपायुक्त विजय मगर म्हणाले की, डॉ भोळे हे विभाग प्रमुख असून नाटक सादर करण्यापूर्वी किमान संहिता वाचायला हवी होती. भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन न केल्यास ५० हजार दंड

दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या लैगिक छळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *