Breaking News

मनू भाकेर आणि सरबज्योत सिंगच्या रूपाने भारताला आणखी एक ऑलिंम्पिकमध्ये पदक सांघिक मिश्र खेळात मिळाले कास्यंपदक

नेमबाज मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. मनू भाकेर हिने एकेरी निशाणबाजीत दाखविलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे कांस्यपदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. त्यानंतर आज पुन्हा मनु भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी सांघिक गटातून १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेतही या दोघांनी कास्यंपदक जिंकले. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे कांस्यपदक मिळाले आहे.

दरम्यान, आज नियोजित पुरुष ऑलिम्पिक ट्रायथलॉन पॅरिसच्या सीन नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबद्दलच्या चिंतेमुळे पुढे ढकलण्यात आले आहे, जिथे शर्यतीचा पोहण्याचा भाग होणार होता.

ऑलिम्पिक एकेरी स्पर्धेत १६ च्या फेरीत पोहोचणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय टेबल टेनिस खेळाडू ठरली. तर सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी त्यांचे दुसरे ऑलिम्पिक सामने खेळून बॅडमिंटनमध्ये भारताचे पहिले पुरुष दुहेरीचे उपांत्यपूर्व स्थान मिळवले. पुरुष एकेरी खेळाडू लक्ष्य सेनने आपल्या सामन्यात विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

बॅडमिंटनमध्ये, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीने उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर लक्ष्य सेनने आपला सामना जिंकला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत