नितीन गडकरी यांची मोठी घोषणा, आता ३००० चा फास्टॅग भरा आणि वर्षभराचा पास मिळवा मासिक फास्टॅग पासेस प्रकरणी नितीन गडकरी यांची नवी योजना

एका ऐतिहासिक उपक्रमात, १५ ऑगस्ट २०२५ पासून ३,००० रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येत आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० प्रवासांपर्यंत, जे आधी असेल ते वैध असेल असे केंद्रीय परिवहन तथा रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

देशातील जवळपास सर्वच राज्यात रस्ते महामार्ग निर्माण करण्यात आले आहेत. मात्र यातील अनेक राष्ट्रीय महामार्गावर एनएचएआयकडून टोल वसूली करण्यात येत आहे. तसेच त्यासाठी टोलसाठी फास्टॅगही संकल्पना वापरण्यात येत आहे. फास्टॅगमुळे वाहतूकदारांच्या वेळेत बचत होत असली तरी मासिक तपास किंवा वार्षिक पास मिळावा यासाठी वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या मागणीनुसार आज केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगवर वार्षिक पासाची योजना आज जाहिर केली. यासंदर्भात नितीन गडकरी यांनी एक व्हिडिओ जारी करत ही घोषणा केली.

नितीन गडकरी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणाले की, हा पास विशेषतः गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन केला आहे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास करण्यास सक्षम ठरणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी/नूतनीकरण करण्यासाठी हायवे ट्रॅव्हल अॅप आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर लवकरच एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया सोपी आणि त्रासमुक्त होईल अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, हे धोरण ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या दीर्घकालीन चिंता अधोरेखित करेल आणि एकाच सोयीस्कर व्यवहाराद्वारे टोल पेमेंट अखंडित करेल असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, वार्षिक पास धोरण लाखो खाजगी वाहन चालकांना प्रतीक्षा वेळ कमी करून, गर्दी कमी करून आणि टोल प्लाझावरील वाद दूर करून जलद, सुरळीत आणि चांगला प्रवास अनुभव देण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही सांगितले.

About Editor

Check Also

एपस्टाईन प्रकरणी प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांची माफी, रशियन महिलेसोबतच्या संबधाची कबुली एपस्टाईन जेफरी प्रकरणी आंतरराष्ट्रीय पातळीवर टीकेचे लक्ष्य होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माफी मागितली

एपस्टाईन फाइल्समध्ये अडकलेले बिल गेट्स आता माफी मागत आहेत. टीका झाल्यानंतर इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *