देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे एकमेकांशी सहजरीत्या भेटणे इतके सोपे नाही. मात्र भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनीही सातत्याने महाविकास आघाडीचे सरकार रात्रीतून कोसळेल, १ मे नंतर पडेल यासह अनेक मुहूर्त जाहीर केले. पण महाविकास आघाडीचे सरकार काही केल्या अद्याप कोसळले नाही. त्यातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकिय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आले.

अखेर याबाबत फडणवीस यांनाच विचारले असता ते म्हणाले की, पवार साहेबांचे ऑपरेशन झाले आहे. त्यांची तब्येतही मधल्या काळात चांगली नव्हती. त्यामुळे आज त्यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ही एक सदिच्छा भेट होती असा खुलासा ही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान या भेटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत भाष्य करण्यात आले नाही. त्यामुळे शरद पवार-फडणवीस यांची झालेली भेट ही खरीच सदिच्छा होती की अन्य राजकिय कारणासाठी होती याबाबतचा प्रश्न तसाच अनुत्तुरीत रहात आहे.

About Editor

Check Also

विधानसभा निवडणूकीत पराभव झाला तरी बार कौन्सिलच्या निवडणूकीत टीएमसी विजयी २३ पैकी १५ जागी टीएमसीचे उमेदवार विजयी भाजपाला अवघ्या तीन जागा

टीएमसीच्या (TMC) वकिलांच्या आघाडीचे सदस्य संजय बर्धन यांनी सांगितले की, ही निवडणूक जिल्हा न्यायालयांमध्ये घेण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *