पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर : या तारखांना होणार मतदान युपीत सात, मणिपूरमध्ये २ तर इतर राज्यात एक टप्पात मतदान

मराठी ई-बातम्या टीम

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुशील चंद्रा यांनी जाहीर करत वेळेवर निवडणूका घेण्याची जबाबदारी आमची असल्याचे सांगत कोविडचे प्रोटोकॉल पाळत या निवडणूक घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. या निवडणूकीसाठी १५ जानेवारी पर्यंत सर्व राजकिय सभा, रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभांसह सर्व प्रकारच्या गर्दी होण्याऱ्या राजकिय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर येथील निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर करत त्यांनी सांगितले की, उत्तराखंड, गोवा आणि पंजाब राज्यांमध्ये एकाच टप्प्यात अर्थात १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. तर मणिपूर राज्यात २७ फेब्रुवारी ३ मार्च अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. तर उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्याचा पहिला टप्पा १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २०-२३,२७ फेब्रुवारी आणि ३ मार्च व ७ मार्चला सातव्या टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. तसेच १० मार्चला या पाचही राज्यांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी १ हजार ६२० मतदान केंद्रेही उभारण्यात येणार आहे. या निवडणूकीसाठी गोवा आणि मणिपूर राज्यातील उमेदवारांसाठी २५ लाखाची खर्च मर्यादा तर पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यातील उमेदवारांना ४० लाख खर्चाची मर्यादा घालून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या वेळेत एक तासाची वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंतच प्रचार करण्याची मुभा राहणार असून गर्दी निर्माण करणाऱ्या सर्व प्रचाराला बंदी घालण्यात आली असून उमेदवारांना जास्तीत जास्त व्हर्च्युअल पध्दतीने प्रचार करण्याची मुभा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

Delhi Airport

Delhi Airport : मध्य पूर्वेतील तणावाचा दिल्ली विमानतळावर परिणाम अनेक उड्डाणे विस्कळीत झाल्याने प्रवासी चिंतेत

Delhi Airport : मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचा दिल्ली विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *