हिमंता बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप, गौरव गोगाई आणि त्यांच्या पत्नीचे पाकिस्तानी एजंटशी संबध आसाम निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते गोगाई यांच्यावर आरोप

काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांच्यात ‘गहन संबंध’ आहेत आणि आयबीकडून मिळालेली माहिती गुप्तपणे शेजारील देशाला पुरवण्यात आली असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी असाही दावा केला की, कोलबर्न भारतात काम करत असताना शेख यांनी तिला पगार देण्यासाठी एफसीआरए (FCRA) नियमांचे उल्लंघन केले.

याशिवाय, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आरोप केला की, तरूणा गोगोई यांनी २०१३ मध्ये पाकिस्तानला एक ‘अत्यंत गोपनीय’ भेट दिली होती आणि तिथे त्यांनी ‘एखाद्या प्रकारचे प्रशिक्षण’ घेतल्याचे मानले जाते.

राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या गौरव गोगोई यांनी सरमा यांच्या पत्रकार परिषदेला ‘सी-ग्रेड सिनेमापेक्षाही वाईट’ आणि ‘सुपर फ्लॉप’ म्हटले.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “आमचा विश्वास आहे की गौरव गोगोई, एलिझाबेथ कोलबर्न आणि अली तौकीर शेख यांच्यात एक गहन संबंध आहे. आमचा विश्वास आहे की एलिझाबेथ आणि अली तौकीर शेख हे एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होते.”

हिमंता बिस्वा सरमा यांनी ठामपणे सांगितले की, त्यांनी स्थानिक नगरपालिका संस्थांसोबत काम करण्यासाठी भारत सरकारला बगल दिली आणि याचा तपास आसाम पोलीस करू शकत नाहीत. “म्हणून आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत राष्ट्रीय स्तरावरील चौकशीची शिफारस केली आहे.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, “एलिझाबेथने पाकिस्तानमध्ये शेख यांच्या ‘लीड पाकिस्तान’ या संस्थेत काम केले. त्यानंतर तिची भारतात बदली झाली आणि तिने त्याच संस्थेत काम केले. परंतु तिचा पगार अली तौकीर शेख यांच्याकडूनच दिला जात होता,” असा आरोप करत पुढे म्हणाले की, लीड पाकिस्तानने लीड इंडियाला पैसे पाठवले आणि लीड इंडियाने एफसीआरए नियमांना बगल देऊन एलिझाबेथला पगार दिला, असा आरोपही केला.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, “पाकिस्तानी संस्था भारतीय संस्थेला देणगी देऊ शकत नाहीत, कारण तो शत्रू देश आहे. कदाचित एलिझाबेथला पगार देण्यासाठी यूपीए सरकारच्या काळात विशेष परवानगी घेण्यात आली असावी,” असा संशयही यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दावा केला की, भारतात काम केल्यानंतर कोलबर्नने भारताशी संबंधित माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि ती शेख यांना अहवाल देत असे. “नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर एलिझाबेथला आयबीच्या सूत्रांकडून हवामान बदलाच्या कृतीबद्दल माहिती मिळाली. तिने शेख यांना ४५ पानांचा अहवाल पाठवला,” असेही सांगितले.

मुख्यमंत्री सरमा यांनी दावा केला की, लीड इंडियासोबत काम करत असताना कोलबर्नने सहा वेळा इस्लामाबादला प्रवास केला, तर दुसऱ्या एका स्वयंसेवी संस्थेत सामील झाल्यानंतर तिने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली. “एलिझाबेथ ही हा प्रकार गुप्त ठेवण्यासाठी केवळ अटारी सीमेवरूनच पाकिस्तानला भेट देत असे आणि ती कधीही विमानाने गेली नाही,” असेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुढे सांगितले की, एफसीआरएचे उल्लंघन करून थेट पाकिस्तानी निधी मिळवणे सोपे नाही आणि त्यांचा विश्वास आहे की, यूपीए सरकारच्या काळात ‘एखादा दुसरा सूत्रधार’ या प्रक्रियेशी ‘खूप जवळून’ संबंधित असू शकतो. त्यांनी असाही आरोप केला की, कोलबर्नचे पगार घेण्यासाठी पाकिस्तानात बँक खाते होते, परंतु चौकशीदरम्यान ते खाते बंद केले आहे की अजूनही सक्रिय आहे, याबद्दल तिने कोणतेही उत्तर दिले नाही. तथापि, गौरवने आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या पाकिस्तानी खात्याचा उल्लेख केला नाही. आता मला वाटते की, त्याच्या प्रतिस्पर्ध्याने प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा वर्मा म्हणाले की, आसाम सरकार कोलबर्नची ओसीआय/व्हिसा रद्द करण्याची मागणी करेल, कारण तिची उपस्थिती भारतासाठी हानिकारक असल्याचे सांगितले.

जेव्हा पत्रकार परिषद सुरू होती, तेव्हा गौरव गोगोई यांनी ‘एक्स’ (X) वर एका पोस्टमध्ये म्हटले: “दिल्ली आणि आसामच्या त्या पत्रकारांची मला दया येते, ज्यांना या शतकातील सर्वात अयशस्वी पत्रकार परिषदेचा सामना करावा लागला. हे एका सी-ग्रेड सिनेमापेक्षाही वाईट होते. आसामच्या ‘तथाकथित राजकीय धूर्त’ मुख्यमंत्र्यांनी “सर्वात मूर्खपणाचे आणि खोटे मुद्दे” मांडले असल्याचे प्रत्तित्युर दिले.

तसेच पुढे बोलताना गौरव गोगाई म्हणाले की, “हा #सुपरफ्लॉप आमच्या #XomoyParivartanYatra च्या अगदी विरुद्ध आहे, जी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बळकावलेल्या १२,००० बिघा जमिनीचा पर्दाफाश करण्यात यशस्वी ठरली आहे,” असे सांगितले.

हिमंता बिस्मा सरमा पुढे म्हणाले की, काँग्रेस खासदाराने डिसेंबर २०१३ मध्ये, लग्नापूर्वी पाकिस्तानला एक “अत्यंत गोपनीय भेट” दिली होती आणि त्यावेळी तो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहत होता. त्यावेळी त्यांचे वडील तरुण गोगोई आसामचे मुख्यमंत्री होते. “त्या भेटीबद्दल आसाम पोलिसांच्या विशेष शाखेला माहिती देण्यात आली नव्हती. आम्हाला आढळले की, व्हिसा केवळ लाहोरसाठी जारी केला असतानाही गौरव यांना इस्लामाबाद आणि कराचीला भेट देण्याची परवानगी देण्यात आली होती. “तो तिथे १० दिवस राहिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गौरव डिजिटल माध्यमांवर पूर्णपणे शांत होता आणि कोणतीही सोशल मीडिया पोस्ट केली गेली नाही.” “आम्हाला संशय आहे की त्या काळात त्याने काही प्रकारचे प्रशिक्षण घेतले असावे,” असे श्री. शर्मा म्हणाले. त्यांनी दावा केला की, पाकिस्तानमधून परत आल्यानंतर आणि खासदार झाल्यावर, गोगोई यांनी लोकसभेत संरक्षण उपकरणे, अणुऊर्जा प्रकल्प आणि इतर संवेदनशील मुद्द्यांवर प्रश्न विचारले, जसे की भारत पाकिस्तानात हेरगिरी करत आहे का.

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, अल्पवयीन मुलाला ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यानंतर गौरव गोगोई यांनी २०२२ मध्ये आपल्या मुलाचा भारतीय पासपोर्ट सुपूर्द केला. गौरवचा मुलगा भारतीय पासपोर्टमध्ये धर्माच्या ठिकाणी ‘हिंदू’ असे लिहित असे, पण नागरिकत्व बदलल्यानंतर त्याने तसे लिहिणे बंद केले. त्याची मुलगी ब्रिटिश पासपोर्टमध्ये ‘ख्रिश्चन’ असे लिहिते. पासपोर्टमध्ये गौरवचा धर्म हिंदू आहे. त्यामुळे, तो त्याच्याच घरात नेहमी अल्पसंख्याक राहील, असेही ते पुढे म्हणाले.

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर सोनिया गांधींनी आपले इटालियन नागरिकत्व सोडले होते आणि राहुल गांधींनी याची तुलना गोगोई यांच्या प्रकरणाशी करावी. आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासादरम्यान गोगोई यांची चौकशी केली नाही, कारण ते विद्यमान खासदार आहेत. “आम्ही त्यांच्या पदाचा आदर ठेवून हा विषय केंद्रावर सोपवला आहे. “जर मी आता गौरव यांना अटक केली, तर माझ्यावर निवडणुकीपूर्वी राजकारण केल्याचा आरोप होईल. अटक करणे हे एक कठोर पाऊल आहे. मला वाटते की गौरव हे सध्या भारतातील सर्वात असुरक्षित राजकारणी आहेत, कारण पाकिस्तानमधील त्यांच्या १० दिवसांच्या वास्तव्यादरम्यानच्या सर्व हालचालींचे फोटो काढले गेले असतील आणि त्या रेकॉर्ड केल्या गेल्या असतील.”

भाजपा नेते हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की, शेख यांनी यूपीए सरकारच्या कार्यकाळात २०१० ते २०१३ दरम्यान १३ वेळा भारताला भेट दिली होती आणि त्यांनी “जागतिक स्तरावर भारतविरोधी कथानकावर” लक्ष केंद्रित केले होते.

शेवटी बोलताना हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले, आसाम पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर, शेख यांनी कोणाला तरी वाचवण्यासाठी सर्व ट्विट्स डिलीट केले.”

About Editor

Check Also

Indian Coast Guard

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाची मुंबईजवळील समुद्रात मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा सागरी टोळीचा पर्दाफाश केला.

भारतीय तटरक्षक दलाने Indian Coast Guard एका धाडसी सागरी कारवाईत आंतरराष्ट्रीय तेल तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *