Breaking News

इस्त्रायल कडून लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले हिजबुल्लाह समर्थक लपलेल्या ठिकाणांवर ४० रॉकेटचा मारा

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या समर्थकांकडून इस्त्रालयावर हल्ला करण्यात येणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्रायली सैन्याने रविवारी सुमारे १०० लढाऊ विमानांसह लेबनॉनमधील डझनभर हिजबुल्लाह समर्थक ठिकाणांवर हल्ला केला. प्रत्युत्तरा दाखल हिजबुल्लाहनेही लेबनॉनमधून इस्रायलच्या भूभागावर ३२० हून अधिक कात्युशा रॉकेट डागले असल्याची माहिती रॉयटर्सने आपल्या वृत्तात दिली.

या हल्ल्यात हिजबुल्लाहचा लष्करी कमांडर फुआज शुक्र ठार झाल्याची माहिती पुढे येत असून या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या हल्ल्याला प्रत्त्युतर म्हणून इस्त्रायलवर रॉकेट्सचा मारा केल्याचा हिजबुल्लाहने सांगितले.

लेबनॉन स्थित हिजबुल्लाहच्या गटाने पुढे असेही सांगितले की, त्यांनी विशेष लष्करी ठिकाणांवर तसेच इस्रायलच्या आयर्न डोम प्लॅटफॉर्म आणि इतर ठिकाणांवर हल्ला केल्याचे सांगत या हल्ल्याचा पहिला टप्पा पूर्णतः यशस्वी ठरला असल्याचा दावाही यावेळी केला.

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी पुढील ४८ तासांसाठी इस्त्रालयमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित केली, तर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उत्तरेकडील वाढत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलाविली.

या बैठकीत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू म्हणाले की, आम्ही आमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी, उत्तरेकडील रहिवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी परतण्यासाठी सर्व काही करण्याचा निर्धार केला आहे. तसेच अशा आणिबाणीच्या परिस्थितीत असलेला एक साधा नियम पाळत असून जो कोणी आम्हाला त्रास देईल – आम्ही त्यांचे नुकसान करू असा इशाराही दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.

इस्रायलच्या सैन्याने सांगितले की, त्यांच्या लढाऊ विमानांनी उत्तर आणि मध्य इस्रायलच्या दिशेने तात्काळ हजारो हिजबुल्लाह रॉकेट लाँचर बॅरल्सवर मारा करून नष्ट केले. या हल्ल्या दरम्यान लेबनॉनमधील ४० हून अधिक प्रक्षेपण क्षेत्रांवर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील काही महिन्यांपासून इस्रायल आणि हिजबुल्लाह दरम्यान असलेला तणाव वाढत असताना, व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते सीन सॅवेट यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन इस्रायल आणि लेबनॉनमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

सीन सॅवेट पुढे बोलताना म्हणाले की, संपूर्ण संध्याकाळपासून त्याच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमसोबत गुंतले होते. त्यांच्या निर्देशानुसार, अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या इस्रायली समकक्षांशी सतत संवाद साधत आहेत. आम्ही इस्रायलच्या स्वतःचा बचाव करण्याच्या अधिकाराचे समर्थन करत राहू आणि आम्ही प्रादेशिक स्थिरतेसाठी काम करत राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

गॅलेट म्हणाले की, इस्त्रायलच्या नागरिकांविरुद्धचा संभाव्य धोका रोखण्यासाठी आम्ही लेबनॉनमध्ये अचूक हल्ले केले. आम्ही बैरूतमधील घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि आमच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेले सर्व मार्ग वापरू असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आयडीएफने म्हटले आहे की त्यांना आढळले की हिजबुल्लाह इस्रायली क्षेत्राकडे “क्षेपणास्त्रे आणि रॉकेट” द्वारे हल्ला करण्याच्या तयारीत असताना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील दहशतवादी संघटनेच्या विरोधात ४० क्षेपणास्त्रे सोडली.
या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, इस्रायल विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, तेल अवीवमधील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ऑपरेशन्स तात्पुरते स्थगित केले आहे.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, राज्यात पानमांजर, गिधाड, रानम्हैससाठी प्रजनन केंद्र दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर

राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *