न्यायालयाचा निर्णय, बलात्कार प्रकरणी प्रज्वल रेवण्णास जन्मठेप आणि ११ लाखाचा दंड विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय

घर कामगार महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यास विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी (१ ऑगस्ट २०२५) दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावत ११ लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे. प्रज्वल रेवण्णा यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली.

११ लाख रुपये दंडाची रक्कम बलात्कार पीडितेला भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.

खटला दाखल झाल्यानंतर अवघ्या १४ महिन्यांनी निकाल देण्यात आला.

प्रज्वल रेवण्णा याने घरकामगार महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) सायबर गुन्हे ठाण्यात दाखल करण्यात आला होता. प्रज्वल रेवण्णावर त्या घरकामगार महिलेवर दोन वेळा बलात्कार केल्याचा आणि त्याचा व्हिडीओ तयार केल्याचा आरोप आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी हसन येथून भाजपाचे उमेदवार प्रज्वल रेवण्णाच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे निवडणुकीपूर्वी रेवण्णाने चित्रित केलेल्या अश्लील व्हिडिओंचा पेन ड्राइव्ह प्रसारित झाल्यानंतर समोर आले.

तथापि, प्रज्वल रेवण्णाने दावा केला की, त्यांच्याशी संबंधित “अश्लील व्हिडिओ” मॉर्फ केलेले होते आणि त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.

खटला ३१ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झाला. पुढील सात महिन्यांत, न्यायालयाने २३ साक्षीदारांची तपासणी केली आणि व्हिडिओ क्लिप्सच्या प्रमुख फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) अहवालांचा तसेच गुन्ह्याच्या ठिकाणाहून घटनास्थळी तपासणी अहवालांचा आढावा घेतला.
तपास आणि खटल्यादरम्यान, पीडितेने भौतिक पुरावा म्हणून एक साडी सादर केली, जी तिने जतन केली होती. नंतर फॉरेन्सिक विश्लेषणात साडीवर शुक्राणूं असल्याचे सिद्ध झाले, न्यायालयात ती साडी सादर करण्यात आले आणि बलात्कार सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून स्वीकारण्यात आला.

पोलिस निरीक्षक शोभा यांच्या नेतृत्वाखालील सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासादरम्यान १२३ पुरावे गोळा केले आणि जवळजवळ २००० पानांचे एक मोठे आरोपपत्र सादर केले.

प्रज्वल रेवण्णाला आयपीसीच्या कलम ३७६(२)(के) आणि ३७६(२)(एन) तसेच कलम ३५४(अ), ३५४(ब) आणि ३५४(क) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.

About Editor

Check Also

केंद्रीय निवडणूक आय़ोगाकडून पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा जाहिर सर्व मतदान केंद्रावरीलवर प्रक्षेपण करण्यास निवडणूक आयोग सक्षम

आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *