परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांचा खुलासा, भारतातील १.४ अब्ज लोकांच्या इंधन ऊर्जेचा प्रश्न महत्वाचा अमेरिकेने केलेल्या दाव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

भारताने गुरुवारी (५ फेब्रुवारी, २०२६) ठामपणे सांगितले की, आपल्या १.४ अब्ज लोकांसाठी ऊर्जा अर्थात इंधन सुरक्षा सुनिश्चित करणे हा पेट्रोलियम उत्पादने मिळवण्याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचा गाभा आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका पत्रकार परिषदेत केलेली ही टिप्पणी, भारताने रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवल्याच्या वॉशिंग्टनच्या दाव्याला उत्तर म्हणून आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल पुढे बोलताना म्हणाले की, “भारताच्या ऊर्जा स्रोतांच्या अर्थांत इंधनाच्या बाबतीत, सरकारने अनेक प्रसंगी सार्वजनिकपणे सांगितले आहे की, १.४ अब्ज भारतीयांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे सांगितले.

पुढे बोलताना रणधीर जयस्वाल म्हणाले की, “वस्तुनिष्ठ बाजाराच्या परिस्थितीनुसार आणि विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार आमच्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणणे, हे सुनिश्चित करण्याच्या आमच्या धोरणाचा गाभा आहे,” असे सांगितले.

तसेच रणधीर जयस्वाल म्हणाले की, “भारताची सर्व पावले हीच बाब लक्षात घेऊन उचलली जातात आणि यापुढेही उचलली जातील,” असे विश्वासही यावेळी दाखविला.

About Editor

Check Also

भारत- ब्राझील दरम्यान होणार २० अब्जहून अधिकचा व्यापार द्विपक्षिय चर्चेत व्यापार वाढविण्याबाबत दोन्ही देशांचे एकमत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इन्सियो लुला दा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *