लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (३१ जुलै २०२५) केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण वगळता सर्वांना माहित आहे की भारताची अर्थव्यवस्था ही एक “मृत अर्थव्यवस्था” आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर २५% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर आणि नंतर भारत आणि रशियाला “मृत अर्थव्यवस्था” अशी हेटाळणी युक्त टीपण्णी केली. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे हे विधान आले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता राहुल गांधी म्हणाले, हो, ते बरोबर आहेत. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांशिवाय सर्वांनाच ते माहित आहे. सर्वांनाच माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही एक मृत अर्थव्यवस्था आहे. मला आनंद आहे की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वस्तुस्थिती सांगितली आहे.
BJP ने भारत की इकॉनमी को तबाह कर दिया है pic.twitter.com/Th7yJunObk
— Congress (@INCIndia) July 31, 2025
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला आश्चर्य का वाटते? भाजपाने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. आणि त्यांनी ते का केले आहे? अदानीला मदत करण्यासाठी, असा आरोपही यावेळी केला.
संसद भवन संकुलात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी असा दावाही केला की अमेरिकेशी व्यापार करार होईल आणि डोनाल्ड ट्रम्प ते परिभाषित करतील, तर पंतप्रधान मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जे सांगतील ते करतील.
शेवटी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, परराष्ट्रमंत्री भाषण देतात की आमचे परराष्ट्र धोरण एक प्रतिभाशाली आहे. एकीकडे, अमेरिका तुमचा गैरवापर करत आहे आणि दुसरीकडे, चीन मागे आहे, आणि तिसरे म्हणजे, जेव्हा तुम्ही जगभरात शिष्टमंडळे पाठवता तेव्हा कोणताही देश पाकिस्तानचा निषेध करत नाही. ते देश कसा चालवत आहेत? त्यांना देश कसा चालवायचा हे माहित नाही, असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
Marathi e-Batmya