वक्फ विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. त्यावरील चर्चेवेळी शिवसेना उबाठा गटाच्या खासदारांनी वक्फ विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, परदेशी नागरिक विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यावेळी विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, देश धर्मशाळा नाही. तर हा देश तुरुंगही नाही. त्यामुळे देशात एखादा अवैधरित्या राहणारा अमेरिकी नागरिक देशात रहात असेल तर त्याच्याही हाता पायात बेड्या ठोकून त्याला परत वॉशिंग्टनला परत पाठवा असे सांगत ह्याला म्हणतात कायदा अशी उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
त्याचवेळी राज्यसभेत संजय राऊत बोलताना कोणी तरी बाळासाहेब ठाकरे असा आवाज दिला. त्यावर संजय राऊत संतापले आणि म्हणाले की, काय तुम्हाला माहित आहे, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याबद्दल, १० वेळा पक्ष बदलणारे तुम्हीला काय माहित असा संतप्त सवालही यावेळी केला. तसेच आम्ही तुमच्या भाषणात व्यत्यय आणला होता, तुम्हाला टोकले होते का मग आमच्या भाषणात का व्यत्यय आणत आहात असा सवाल केला.
त्यावर तालिका अध्यक्षांनी संजय राऊत यांना पुढे बोलण्याची सूचना केली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, वक्फ विधेयकातील तरतूदींबाबत अनेक सदस्यांना शंका आहेत, तसेच त्यातील काही तरतूदींवरून आक्षेपही आहेत. त्यामुळे हे विधेयक पुन्हा एकदा स्थायी समितीकडे पुन्हा पाठविण्यात यावे आणि त्यावर सविस्तर चर्चा करून पुन्हा त्याबाबत निर्णय घेण्यात अशी मागणीही यावेळी केली.
Sanjay Raut ने सदन में चुटकी बजाकर किसे कहा – ऐ…कौन बोला ? Rajya Sabha म… https://t.co/G30wFM5byi via @YouTube
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 2, 2025
दरम्यान राज्यसभेत शिवसेना उबाठा पक्षाची भूमिका मांडण्या आधी संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. भाजपाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मिशांना पिळ देत फिरतेय. पण या विधयेकावरून गोंधळ निर्माण करण्याची भाजपाची खाज आहे, अशी टिका केली. महिला विधेयकाच्या वेळी सभागृहात ज्या पद्धतीचा गोंधळ, दंगल झाली तशाच प्रकारची दंगल दोन्ही सभागृहात घडवण्याचा डाव भाजपाचा आहे, असा आरोपही केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खोचक ट्विटवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. या विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे हे देवेंद्र फडणवीस सांगू शकतील का?, असा सवाल करत इतर विधेयकांप्रमाणेच हे एक विधेयक आहे. सरकारने आणलेल्या विधेयकाचा संबंध असलाच तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यात कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपे जावे याच्याशी असून त्यासाठीच या विधेयकाचे स्पष्ट प्रयोजन दिसते, असा टोलाही यावेळी लगावला.
देवेंद्र जी,
वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही,
ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची!
विषय राहुल गांधींचा ,
त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता!
तुमच्यात हा दम आहे?
बोला । https://t.co/YRkjEyTQDT— Sanjay Raut (@rautsanjay61) April 2, 2025
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, बिहार सारख्या राज्यामध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्यात दुफळी माजावी, गोंधळ निर्माण व्हावा, दंगली व्हाव्यात अशी भाजपाची भूमिका आहे. नितीश कुमार हे पूर्णपणे मानसिक, शारीरिक दृष्ट्या विकलांग झाले आहेत. या निमित्ताने त्यांचा पक्ष गिळायचा, नष्ट करायचा आणि आपल्यात सामावून घ्यायचा हे भाजपाचे पुढचे पाऊल आहे. नितीश कुमार यांच्यानंतर हा पक्ष अस्तित्वातच राहणार नाही. तो एकखांबी तंबू असून निवडणुकीनंतर त्यांचा पक्षच ठेवायचा नाही आणि संपूर्ण बिहारवर राज्य करायचे धोरण भाजपाचे आहे, असा आरोपही केला.
Marathi e-Batmya