दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: मिळणार सवलतीचे गुण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मागील दोन वर्षांपासून कोविड कारणामुळे एकाही विद्यार्थाला क्रिडा स्पर्धेत किंवा खेळाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे क्रिडा गुण मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गतवर्षी लेखी परिक्षा घेण्याऐवजी मुल्यांकन करत निकाल जाहीर करण्यात आला होता. परंतु यंदाच्यावर्षी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिक्षा होत असल्याने यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रिडा प्रवर्गातून सवलतीचे गुण देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला असून त्याबाबतचे आदेशही देण्यात आल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

अखेर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन २०२१-२२ या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन २०२१-२२ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

ही सवलत केवळ सन २०२१-२२ च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना इलिमेंटरीच्या चित्रकला स्पर्धेत भाग घेता आला नाही अशा १० वीच्या विद्यार्थ्यांनाही या स्पर्धेमुळे मिळणारे सवलतीचे गुणही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

ईडीची मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव तपासात अडथळा आणल्याचा आरोप करत दाखल केली याचिका

सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अर्थाने ईडी सर्वोच्च न्यायालयात कलम ३२ नुसार याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *