Asian Games 2023: भारताला आणखी एक गोल्ड मेडल महिला क्रिकेट संघाची श्रीलंका संघावर मात

सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या Asian Games 2023 आशियाई स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने आज श्रीलंकेच्या महिला संघावर १९ धावांनी मात करत क्रिकेट स्पर्धेतील गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. त्यामुळे भारताच्या खात्यात आणि एक गोल्ड मेडल जमा झाले आहे.

मागील दोन दिवसांपासून महिला क्रिकेट संघाकडून विविध देशांच्या महिला संघाबरोबर सामने झाले. त्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाने विजयही मिळविला. मात्र आज श्रीलंकेच्या महिला संघासोबत झालेल्या अंतिम सामन्या दरम्यान भारताच्या महिला संघाचा चांगलाच कस लागला. त्यामुळे भारतीय महिला संघाला न मानवणारी मैदान, कमी रणांची संख्या आदीमुळे अनेकांच्या मनात धाकधुक होती. अखेर श्रीलंका महिला संघावर १९ धावसंख्येची आघाडी घेत भारतीय महिला संघाने विजय मिळविला.

आतापर्यंत दिव्यांश पनवार, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, रूद्राक्ष पाटील यांनी महिला आणि पुरुष गटात १० मीटर एअर रायफल स्पर्धेत पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवून दिले. तर जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनीत कुमार आणि आशिष यांना एअर रायफल मध्ये ब्रॉझ पदक मिळविले.

तसेच ऐश्वर्या आणि प्रताप सिंग तोमर यांनाही वैयक्तीक गटातील अंतिम एअर रायफल स्पर्धेत ब्रॉझ पदक मिळाले.

About Editor

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा, गांधी, नेहरूचा हिंदूस्तान लिंचिस्तान बनत चाललाय बांग्लादेशातील हिंदूची हत्या झाल्यानंतर केली केंद्रावर टीका

बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *