अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (१५ मे २०२५) असा दावा केला की, भारताने अमेरिकन वस्तूंवरील सर्व कर कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
दोहा येथे झालेल्या व्यावसायिक गोलमेज बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही सांगितले की, त्यांना टिम कुकशी “थोडीशी अडचण” आहे आणि त्यांनी अॅपलच्या सीईओंना सांगितले की, त्यांनी भारतात आयफोन बनवायचे नाहीत.
आखाती प्रदेशातील त्यांच्या चार दिवसांच्या दौऱ्यात कतारमध्ये असलेले डोनाल्ड ट्रम्प भारतात आयफोन बनवण्याच्या अॅपलच्या योजनांबद्दल बोलत होते.
अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी त्याला (कुक) म्हणालो, माझ्या मित्रा, मी तुमच्याशी खूप चांगले वागतो. तुम्ही ५०० अब्ज डॉलर्स घेऊन येत आहात, पण आता मी ऐकले आहे की तुम्ही संपूर्ण भारतात अॅपल तयार करण्याचे कारखाने बांधत आहात. मला तुम्ही भारतात अॅपलचे कारखाने उभारू नका, असे सांगत जर तुम्हाला भारताची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही भारतात प्रकल्प उभारू शकता, कारण भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे, म्हणून भारतात विक्री करणे खूप कठीण असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी (भारताने) आम्हाला एक करार दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी मुळात आमच्याकडून कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे मान्य केले. मी म्हणालो, ‘टिम, आम्ही तुमच्याशी खूप चांगले वागतो आहोत, तुम्ही चीनमध्ये वर्षानुवर्षे बांधलेल्या सर्व प्लांटना आम्ही सहन करतो. आम्हाला भारतात तुम्ही प्लांट उभारण्यात रस नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो’,असेही यावेळी सांगितले.
भारताकडून अशी कोणतीही घोषणा झालेली नाही.
President Trump Delivers Remarks to Troops at Al Udeid Air Base, May 15, 2025 https://t.co/ey4MjZP9af
— The White House (@WhiteHouse) May 15, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांचे हे वक्तव्य अॅपलचे प्रमुख टिम कुक यांनी त्यांच्या कंपनीने भारतासह अनेक देशांमध्ये तिमाही रेकॉर्ड केल्याचे म्हटल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांनी आले.
जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन भारतातून अॅपल खरेदी करेल, तर कर शुल्काबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर चीन इतर बाजारपेठांसाठी बहुतेक डिव्हाइसेसचे उत्पादन करेल, असे टिम कुक यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले.
एस अँड पी ग्लोबलच्या विश्लेषणानुसार, २०२४ मध्ये अमेरिकेत अॅपलची आयफोन विक्री ७५.९ दशलक्ष युनिट्स होती, तर मार्चमध्ये भारतातून निर्यात ३.१ दशलक्ष युनिट्स इतकी होती.
या महिन्याच्या सुरुवातीला, डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, भारताने त्यांचे उच्च शुल्क (कर) “शून्य” करण्यासाठी “सहमत” आहे.
भूतकाळात, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला “टॅरिफ किंग” आणि “मोठा गैरवापर करणारा” म्हटले आहे.
Marathi e-Batmya