Tag Archives: अजित पवार

काका शरद पवार, पुतण्या अजित पवार शेजारी बसता बसता पुन्हा एक हात अंतर वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमात काका-पुतण्यात नेमकं काय घडलं

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांनी एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केल्याचे दिसून आतापर्यंत दिसून आले. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर बसणेही टाळले. परंतु वसंतदादा पाटील शुगर इन्स्टीट्युटच्या आज आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात मात्र मंचावर एकत्रित बसण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »

जळगाव परधाडे येथील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी; अजित पवारांना दुःख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी, प्रशासनाकडून वेगाने मदतकार्य

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजिक परधाडे येथील रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली, तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोंकासोबत फिरा

महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन …

Read More »

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरुवात छगन भुजबळ आले, प्रफुल पटेल म्हणाले, ते ज्येष्ठ नेते ते आमच्या कुटुंबातील टोकाची नाराजी नाही

विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षात नाराजी छगन भुजबळ यांच्या निमित्ताने बाहेर आली. त्यातच छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून स्वतः अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्याकडून नाराजी दूर करण्यासंदर्भात अद्याप कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगितले जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय अधिवेशासाठी नाराज छगन भुजबळ येणार की नाही अशी चर्चा …

Read More »

नौदलाच्या ताफ्यात तीन युद्धनौकांचा समावेश; पंतप्रधानांच्या उपस्थित राष्ट्रार्पण भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल

निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) …

Read More »

आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ३ कोटी ८ लाखांचा निधी बाबा आमटे यांच्या संस्थेसाठी राज्य सरकारकडून निधी

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी १ कोटी ८६ लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी १ कोटी २२ लाख रुपये असे एकूण ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले …

Read More »

शरद पवार यांची खोचक टीका,…पण कुणीही तडीपार झालं नाही अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, असं कसं चालणार ? कांदा व दूध दरवाढीसाठी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन

कांदा व दूध दर वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बारामती आज आंदोलन करण्यात आले पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह युवा नेते योगेंद्र पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेले शेतकऱ्यांना आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी …

Read More »

सुनिल तटकरे यांची माहिती, १८ व १९ ला दोन दिवसीय राष्ट्रवादीचे शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे अडीचशे निमंत्रितांसाठी शिबीराचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरात विद्यमान खासदार, विद्यमान आमदार, माजी खासदार, आमदार, विधानसभा लढलेले सर्व उमेदवार, फ्रंटल सेलचे प्रमुख व इतर …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका, स्वतः गाडीत बसून तो पोलिसांच्या दारात येतो…. राज्यव्यवस्था कुठे चाललीय, हा सगळा संशयाचा सापळा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना न सापडलेला संशयित आरोपी वाल्मिक कराड हा थेट स्वतः गाडीत बसून त्याच्यासोबत दोन चार माणसं सोबत घेऊन आला. बरं त्याने पोलिसांना दाखवून दिलं की आपण तुम्हाला मोजत नाही. तसेच सीआयडीला शरण येण्यापूर्वी त्याने जो व्हिडिओ रिलिज केला त्यात तो स्वतः सांगतो की, …

Read More »