राज्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासमोर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या पत्रात म्हटले की, राज्यात ऑगस्ट …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णयः नीति आयोगाच्या मदतीने मुंबईचा आर्थिक कायापालट मास्टर प्लॅन सादर करणार, राज्यातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम, नोडल अधिकारी नेमणार
मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली. राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात नीति …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे टीकास्त्र, आम्ही असा काही करंट दिला की…. शासन आपल्या दारी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका
परभणी जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, देश चंद्रावर जात आहे. मात्र काहीजण घरात बसून राज्य चालवित होते असा उपरोधिक टोला …
Read More »अतुल लोंढे यांचा टोला, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळेल शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विधानावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळू शकतो, असा टोला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना …
Read More »अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
महाराष्ट्रात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिले. राज्य लॉटरीच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, लेखा व कोषागार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, १ ट्रिलियन अर्थ व्यवस्थेसाठी जिल्हा केंद्र मानून विकासयोजना महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेसंदर्भातील बैठकीत
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट २०२८ पर्यंत पूर्ण करायचे असेल, तर मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या बरोबरीने सर्वच विभागातील जिल्ह्यांचा सर्वसमावेशक विकास करावा लागेल. कृषी, कृषीपूरक उद्योग, ऊर्जा, पायाभूत सुविधा, दळण-वळण, गृहनिर्माण, मध्यम व लघुउद्योग, कौशल्य विकास, उत्पादन, सेवा आदी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यविस्तार करुन विकासाच्या नवीन …
Read More »या राजकिय नेत्यांनी वाहिली सीमा देव यांना श्रध्दांजली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना आदरांजली
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे. चतुरस्त्र अभिनेत्री हरपली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून …
Read More »पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर कराव्यात. या अनुषंगाने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे
राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रिक्त पदे भरण्याला प्राधान्य
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले असून त्यांची झालेली नियुक्ती म्हणजे एक सेवेची संधी आहे. या कामाच्या माध्यमातून राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुधारणेच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »
Marathi e-Batmya