Breaking News

Tag Archives: शिवसेना उबाठा

संजय राऊत यांची घोषणा, अखेर आज महाविकास आघाडीचा विस्तार, हे पक्ष झाले सहभागी

महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी झालेली नसून राज्यातील आघाडी आता मजबूत झाली आहे. तसेच या आघाडीचा विस्तार झाला आज झालेला असल्याची घोषणा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जसे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी केल्याचे पत्र हवे तसे पत्र आंबेडकर यांना …

Read More »

शिवसेना उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसची राज्यसभेतील जागा कमी होणार

महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १६ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या ६ जागांचा समावेश आहे. यात शिवसेना …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक सवाल,… मोदींचे राज्य की औरंगजेबाचे

मागील काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या संजय राऊत यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंदवून तुरुंगवास भोगल्यानंतर आता ईडीने कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना आणि संजय राऊत यांच्या मुलीला ईडीने नोटीस पाठविली. या ईडी नोटीसीवरून संजय राऊत यांनी ईडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल… उदयनिधी स्टॅलिनची मते उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का ?

सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणा-या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा वारंवार करत …

Read More »

अंबादास दानवे यांची मागणी, रुग्णवाहिका टेंडर निविदा रद्द करून चौकशी करा

राज्य सरकारने १०८ रुग्णवाहिकाच्या सेवेसाठी नव्याने काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठया प्रमाणात घोटाळा झाला असून या टेंडरप्रकरणी आरोग्य विभागाच्या आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत या टेंडरची निविदा रद्द करून निःपक्षपातीपणे याची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली. अंबादास दानवे म्हणाले की, …

Read More »

आशिष शेलार यांचा पलटवार, जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर..!!

मुख्यमंत्रीपदासाठी “महा”कपट, “महा”धोका केला नसता; अडीच वर्षे..असं काही ठरलं नसताना ही “महा”खोटं बोलला नसता;रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या “महा” शकुनीला आवरले असते तर अशी “महा” पत्रकार परिषद घेण्याची, नौटंकीची वेळ आली नसती…जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर… अश्या म्हणत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर …

Read More »

राहुल नार्वेकर यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, त्यांच्या कागपत्रांमध्ये तो मुद्दाच नाही

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाची महापत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निकाल दिलेला नसल्याचा आरोप करत खोचक शब्दात टीका केली. त्यानंतर काही वेळातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि तीन क्रायटेरियानुसारच निर्णय घेतल्याचे सांगत अनिल परब …

Read More »

राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे आणि शिंदे गटाची न्यायालयात धाव

राज्यातील बहुचर्चित शिवसेनेतील आणि सत्ताकारणातील महत्वाच्या घटनांचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेतील मागणीप्रमाणे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर शिवसेना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांच्या ७५ जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी?

महाराष्ट्रातील बेकायदेशीर राजवटीच्या दावोस शिष्टमंडळाबद्दल असं कळतंय की, घटनाबाह्य मुख्यमंत्री जवळपास ५० लोकांचा वैयक्तिक ताफा घेऊन दावोस ला जात आहेत. ह्यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि इतरही बरेच जण समाविष्ट आहेत. पती-पत्नी जास्तीत जास्त समजू शकतो, परंतु त्यांच्यापैकी काहींसाठी, त्यांच्या मुलांना देखील ही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत घेतले जात आहे. जवळजवळ ७० लोक …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, ठाकरे सरकारमुळे …महापालिकेच्या ठेवी घटल्या

ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील बिल्डरांना केलेला ५०% प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट झाली, असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केला. महायुतीतर्फे आज मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा सभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजपा …

Read More »