Breaking News

Tag Archives: सुप्रिया सुळे

ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, हा आनंदाचा शिधा आहे की, गोरगरीब जनतेची क्रुर थट्टा…

देशासह महाराष्ट्रातील ऐन सणासुदीच्या काळात जीवनाश्वक वस्तुंच्या दरात होणारी वाढ या पार्श्वभूमीवर आणि भाजपाप्रणित एकनाथ शिंदे यांचे सरकार किती जनसामान्यांच्या प्रती सहानुभूतीदारक आहे हे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी दिवाळी- दसऱा सणासुदीच्या अनुषंगाने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १०० रूपयात सणासाठी लागणाऱ्या वस्तू देण्याची घोषणा केली. ती योजना पुढील सणासुदीच्या काळातही …

Read More »

देवेंद्र फडणवीस, सुनिल तटकरे यांना अचानक का होतेय त्यांच्या जातींची आठवण? राज्याच्या राजकारणात नव्या जातीय समिकरणांचा उदय होऊ पाहतोय का

राज्याच्या राजकारणासह संपूर्ण देशभरात पक्ष कोणताही असेल पण, निवडणूकीच्या काळात त्या त्या राजकिय पक्षाकडून एखाद्याला उमेदवारी देताना त्या संबधित उमेदवाराची जात पाहिली जाते. तसेच त्या त्या मतदारसंघात उमेदवाराच्या जातीची लोकसंख्या आणि उमेदवाराची आर्थिक ताकद पाहुन पक्षाकडून निवडणूकीतील उमेदवारी दिली जाते. या मार्गाचा अवलंब जवळपास सर्वच पक्षाकडून केला जातो. त्यामुळे “जात …

Read More »

सुप्रिया सुळे यांचे लोकसभाध्यक्षांना पत्र,… सुनिल तटकरेंना निलंबित करा

पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना सल्ला, …भाजपापासून सांभाळून रहा मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्यावा

जालन्यात अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. तसंच, पुण्यात कोयता गँग सक्रीय आहे. ड्रग्ज माफियांचं साम्राज्य या राज्यात आहे. इतकचं काय तर राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत हे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यांना आरक्षण दिलं जात नाही. महाराष्ट्र आज पेटला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे गृहखात्याचं अपयश असल्यानं, …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, राज्य- केंद्राने लवकर निर्णयाची आवश्यता, पण आता… विलासराव देशमुख यांचे मित्र विनायकराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते तथा पूर्वाश्रमीचे स्व.विलासराव देशमुख यांचे घनिष्ट मित्र विनायकराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज देशाच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न या आरक्षणाच्या प्रश्न आधी देखील चर्चा झालेली आहे. मी स्वतः जरांगे पाटलांची …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाला भाजपाचा विरोध विद्यमान गृहमंत्री राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अपयशी गृहमंत्री

मुंबईतील बस बेस्ट कामगारांच्या समस्या संदर्भात प्रतीक्षा नगर येथील बस डेपो मध्ये जाऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेणार आहेत असे सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस बारामतीत येऊन म्हणाले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण देऊ. …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, ट्रिपल इंजिन सरकार करतेय तरी काय? सरकार फक्त खोक्यात व्यस्त

राज्यातील अनेक घटक सध्या आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षण मागत आहेत. याविषयी सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवावं. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाद, रशियाचा वाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने संसदेचं अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली पाहिजे. तसंच, महाराष्ट्रात आरोग्य, शिक्षण, आरक्षणाचे मुद्दे अशी गंभीर आव्हानं राज्यासमोर …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या मंत्र्यांनी निर्णय घेतला त्यांच्याच बरोबर सत्ता उपभोगायची… राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर झेपत नसेल तर त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगावं

भारतीय जनता पक्षाबद्दल हसावं आणि त्यांच्या या केविलवाण्या प्रयत्न बद्दल काय बोलावं हा प्रश्न मला पडला आहे. माझी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनम्र विनंती आहे की, आपण सगळ्या वृत्तवाहिन्यांवर पाहतच असाल. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा परिणाम तेथील सामान्य नागरिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी …

Read More »

शरद पवार म्हणाले, तुमच्या राष्ट्रवादीचं म्हणण बरोबर असल्याचे लवकरच कळेल… बॅलार्ड पिअर्स येथील जाहिर सभेत शरद पवार यांच सुतोवाचं

मध्यंतरी आपल्या पक्षातील काही जणांनी वेगळा विचार करून वेगळा निर्णय घेतला. तसेच त्यांनी त्यांचा अध्यक्ष निवडल्याचेही वर्तमान पत्रात वाचलं. पण तुम्ही निवडलेला अध्यक्ष तुरुंगात गेला हे मला माहित आहे. पण त्यांनी निवडलेला अध्यक्ष तुरुंगात गेला की नाही मला माहित नाही असा टोला अजित पवार आणि गटाचे नाव न घेता राष्ट्रवादी …

Read More »