काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाच्या कारभाराची व देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली पण त्याचा विपर्यास करून सपकाळ यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापली काय, डोळे फोडले, काय अशी चिखवणीखोर विधाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहेत, हे अत्यंत आक्षेपार्ह असून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर …
Read More »विरोधक २७९ च्या प्रस्तावावर पण एकनाथ शिंदे यांचे उत्तर दोन शिवसेनेतील भांडणावर अनिल परब मला तुमची सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत, कमरे खालची वार मी करत नाही
विधान परिषदेत विरोधकांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून २७९ अन्वये प्रस्ताव दाखल करत त्यावर चर्चा सुरु केली. चर्चेनंतर विरोधकांच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्तर देता देता शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी फक्त हात वरून बोलण्याची परवानगी विधान …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार, भाजपाचे नेतेच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करतायत वेंद्र फडणवीसांच्या कारभारावरील टीकेने मराठी अस्मितेला ठेच कशी पोहचते? छत्रपतींच्या अपमानाने मराठी अस्मितेला ठेच पोहचत नाही का?
महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरु आहे तो अत्यंत वाईट आहे. संतोष देशमुखांची निघृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे असतानाही भाजापाचे काही नेतेच देवेंद्र फडणवीस यांची तुलना क्ररकर्मा औरंगजेबाशी करत आहेत, असे …
Read More »विधान परिषदेत हर्षवर्धन सपकाळ पडले एकटे, भाजपा आणि शिवसेना उबाठा एकत्र अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या त्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गोंधळ
विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरु होताच सभापती राम शिंदे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले असल्याचा मुद्दा उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबशी करून महाराष्ट्राचा अपमान केला …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महायुती सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ …’ सारखे टोळ्यांचे सरकार औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक, महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा भाजपाचा डाव
राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन हर्देषऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,… फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना सभ्यता, संस्कृती व लोकशाहीची मुल्ये जोपासलेल्या सिंधुदुर्गात आता ‘हम करो सो कायदा’ म्हणणारे लोक
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, युवा शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा सरकारने घेतलेला बळी नागरे यांना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा
राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप,…महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?, नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा
महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, शेतकरी महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणार पोकळ अर्थसंकल्प महाराष्ट्र आता थांबणार नाही, भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार
आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून उत्पन्नापेक्षा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टीका, औरंगजेबाचा कारभार आणि फडणवीसांचा कारभार सारखाच… बीडकरांचा एकच नारा, ‘जातीपातीला नाही थारा’, घोषणा देत हजारोंचा समुदाय सामाजिक सद्भावनेसाठी एकवटला
औरंगजेबाने वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला आणि कायदा सुव्यवस्थेला कैद करून ठेवले आहे. औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सारखाच आहे. असा ह्ल्लाबोल करत संतोष देशमुख भाजपाचा कार्यकर्ता होता, त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली पण भाजपाचे प्रांताध्यक्ष देशमुख यांच्या घरी गेले नाहीत. …
Read More »
Marathi e-Batmya