राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये ५० …
Read More »एकनाथ शिंदे यांची ग्वाही, सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध आपत्ती व्यवस्थापनात तात्काळ प्रतिसाद आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, जलसंधारण, पुनर्विकास आणि नागरिकाभिमुख विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केले. अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुंबईतील मेगा काँक्रीट …
Read More »सतेज बंटी पाटील यांचे प्रत्युत्तर, सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही राजकीय हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरला नाही
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, पोलीस यंत्रणेतील रिक्त पदे, दोषसिद्धीचा घटता दर आणि विविध विकास प्रकल्पांमधील पारदर्शकतेच्या अभावावर सरकारला धारेवर धरले. काँग्रेस आ संतेज बंटी पाटील यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, राज्याचा विकास थांबणार नाही महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू …
Read More »एकनाथ शिंदे यांची ग्वाही, विदर्भाच्या वैभवासाठी कटिबद्ध, मुंबई फास्ट..महाराष्ट्र सुपर फास्ट अंतिम आठवडा उत्तरात घेतला विकास कामांचा आढावा
‘सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. मुंबईतील पुनर्विकासातील अडथळे दूर करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या २३ जानेवारी पासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईकरांसाठी या योजना आणून बाळासाहेबांच्या चरणी …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ते ‘महाराष्ट्रात हे कधी थांबणार’ चा प्रवास राज्यात महागाई, बेरोजगार, कायदा सुव्यवस्थेची स्थिती पण सरकार म्हणतंय… बाकी सब ठीक है
१९५३ साली झालेल्या करारानुसार विदर्भातील जनतेला आम्ही वचन दिलेलं की, विदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी दरवर्षी सहा आठवड्याचे अधिवेशन घेऊ. आता सहा आठवड्याचे अधिवेशन एक आठवड्यावर आले आहे. त्यात किमान एक दिवस तरी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. हा विदर्भाच्या जनतेचा अवमान असल्याचा आरोप जंयत पाटील यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देताना म्हणाले, मेट्रोसारखे डबे उपनगरीय रेल्वेला द्या गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल
महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना देण्यात येत आहे. राज्याच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून शहरी आणि ग्रामीण विकास अधिक गतिमान केला जात आहे. तसेच, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यात …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, महायुतीचे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा
हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारला लगावला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण संबोधायचो. “पुणे तिथे काय उणे” …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, एखादा सगा सोयरा जरी आला तरी कारवाई करणार अमली पदार्थ नियंत्रणासाठी शाळा, महाविद्यालयात अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना
देशाला नव्हे, तर जगाला हेवा वाटावा, असा समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. या राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही, याठिकाणी केवळ प्रगती नांदेल, ही काळजी शासन घेत आहे. संविधान सगे आणि राज्याची १३ कोटी जनता सोयरे असल्याच्या भावनेतून सर्वोत्तम महाराष्ट्र निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेटमध्ये बेटींग आयपीएल बेटींगच्या संभाषणाचा पेनड्राइव्ह सभापतींकडे सादर
मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत बेटींग संदर्भातील पोलिसांच्या संभाषणाचा पेन ड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. …
Read More »
Marathi e-Batmya