बोरिवली येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नये तसेच पालिकेतर्फेच अद्यावत आणि सुसज्ज असे ९ मजल्यांचे ४९०खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या …
Read More »अंबादास दानवे यांची टीका, सरकार अदानीचे कर्ज माफ करू शकते पण शेतकऱ्यांचे नाही निवडणूकीतील आश्वासन पूर्ण करू शकत नाही
पीक कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय धुमाकूळ सुरू झाला आहे. अजित पवार यांच्या विधानाला महायुतीतील मित्रपक्षांकडून पाठिशी घालण्याचा प्रयत्न सुरु केला असताना , शिवसेना उबाठाने मात्र अजित पवार यांच्या वक्तव्याचा विरोध करत, महायुती सरकारने खोटी निवडणूक आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. बारामतीतील एका कार्यक्रमात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एमपीएससी परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप लागू करण्याचा निर्णय कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. २०२२ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर २०२५ पासून तो लागू करण्याचे ठरवण्यात आले. आता तो मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सदस्य प्रवीण दरेकर यांनी …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेटमध्ये बेटींग आयपीएल बेटींगच्या संभाषणाचा पेनड्राइव्ह सभापतींकडे सादर
मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत बेटींग संदर्भातील पोलिसांच्या संभाषणाचा पेन ड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. …
Read More »स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या गाण्यावरून विधान परिषेदत गोंधळ कुणाल कामरा यांना अटक करण्याची भाजपा सदस्य प्रसाद लाड यांची मागणी
स्टॅड अप कॉमेडियन कुमाल कामरा याने महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीवर आणि दिल्लीतील पंतप्रधान मोदी यांच्यावर विडंबनात्मक गायलेले गाण आज सकाळी प्रसारीत झालं. त्या गाण्यावरून विधान परिषदेत भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तर भाजपाचे प्रसाद लाड यांनी कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी …
Read More »दिशा सालियन मृत्यू प्रकरणः चित्रा वाघ-मनिषा कायंदे-अनिल परब वाद, कामकाज स्थगित आदित्य ठाकरे यांच्या कथित नावावरून भाजपा आणि- शिवसेना उबाठा आक्रमक
बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापन दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी जवळपास पाच वर्षानंतर नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव त्या याचिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर न्यायालयात जर एखादी याचिका दाखल आणि …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी वाळू धोरण विधान परिषदेत अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे यांची माहिती
वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या राज्यात महसूल आणि पोलीस दलाकडून संयुक्त कारवाई करण्यात येते. परंतु राज्यात वाळू माफिया आणि वाळू तस्करीच्या घटना वाढतच आहेत. यासाठीच राज्य शासन सर्वंकष वाळू धोरण तयार करणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेमध्ये दिली. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला …
Read More »विधान परिषदेत हर्षवर्धन सपकाळ पडले एकटे, भाजपा आणि शिवसेना उबाठा एकत्र अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या त्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गोंधळ
विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरु होताच सभापती राम शिंदे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले असल्याचा मुद्दा उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबशी करून महाराष्ट्राचा अपमान केला …
Read More »शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार
आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक …
Read More »शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य, समर्थनार्थ मोठा मेळावा होणार विरोधी पक्षननेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
राज्यातील देवस्थानांना जोडणारे रस्ते आधीच चांगल्या आणि सुस्थितीत असताना पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. हा मार्गमार्ग १२ जिल्ह्यातून जाणार असून या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्ग मोठ्या प्रमाणावर रेटला जात आहे. आजच्या मोर्चात फक्त कोल्हापूरचे शेतकरी आले आहेत. मात्र भविष्यकाळात …
Read More »
Marathi e-Batmya