मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ३४ हजार ७६८ कोटी रुपये गुंतवणुकीच्या १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. या गुंतवणुकीमुळे राज्यात ३३ हजारहून अधिक रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. या गुंतवणुकीत उत्तर महाराष्ट्रातील ९ हजार ८६६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश …
Read More »उदय सामंत यांचे आश्वासन, ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी कायदा करणार विधान परिषदेतील लक्षवेधीला उत्तर देताना दिली माहिती
मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवण्यात येते. या ट्रान्झिट कॅम्पचे भाडे तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत लवकरच कायदा करणार, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी ताडवाडी येथील बीआयटी इमारतीच्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला …
Read More »उदय सामंत यांचे आश्वासन, गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जमीन संपादन एक तृतीयांश जमिन संपादनाच्या नियमांची अंमलबजावणी करणार
मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात २०१९ पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार (कलम ५८) आणि नवीन डीसीपीआर (कलम ३५) अंतर्गत, गिरणीच्या जागेचे तीन सम भाग करून त्यातील एक तृतीयांश (वन थर्ड) जमीन महानगरपालिकेस बगीचे व क्रीडांगणासाठी, एक तृतीयांश गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि उर्वरित भाग मालकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या नियमाची मुंबईत अंमलबजावणी सुरू …
Read More »उदय सामंत यांची माहिती, शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक
राज्यभरातील शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री डॉ. सामंत बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला. मंत्री …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाईत पक्षपातीपणा नको त्या त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रक म्हणून समितीत बोलावले जाईल - मंत्री उदय सामंत
बेकायदेशीर धार्मिक बांधकामांवर कारवाई करताना कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात निवडक पद्धतीने पावले उचलू नयेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारकडे केली. अनधिकृत धर्मस्थळांच्या कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधींना स्थान द्यावे, अशी मागणीही यावेळी केली. विधानसभेत भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी मुंबईतील …
Read More »उदय सामंत यांचे स्पष्टीकरण, गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासात सिडकोची सकारात्मक भूमिका पनवेलमधील एक ते ११ इमारतीचे पुनर्विकास होणार
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सेक्टर एक ते अकरा क्रमांकाच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक आहे. संबंधित सोसायट्यांनी पूर्वी बंगल्यांसाठी अथवा रो हाऊससाठी मिळालेल्या प्लॉटवर बहुमजली इमारती उभारल्या आणि त्यामधील सदनिकांची विक्री केली. त्यानंतर सिडकोने अशा इमारती नियमित करण्यासाठी धोरण आणले असून, काही प्रकरणे याअंतर्गत नियमितही करण्यात आली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत …
Read More »भिवंडीला आशिया खंडातील लॉजिस्टिक हब साठी समिती गठीत करणार त्यात भिवंडी पूर्व चे आमदार रईस शेख यांचा समावेश
भिवंडी मध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब बनविण्यासाठी सरकार एक समिती गठीत करेल आणि त्यात उद्योग, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांचा समावेश असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. आमदार रईस शेख यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान भिवंडीला लॉजिस्टिक हब विकसित करण्याकडे सरकारचे लक्ष …
Read More »वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल, ज्या माशेलकर समितीचा संदर्भ दिला जातोय ती विभागाची नाही सत्ताधारी आणि सरकारचे दलाल खोट्या अफवा पसरवतायत
भाजपाच्या हिंदी सक्तीच्या अजेंडाविरुद्ध आज उभा महाराष्ट्र एकवटला असताना ही एकजूट होऊ नये आणि भाजपच्या महाराष्ट्र व मराठी द्वेषी धोरणाविरुद्ध मराठी माणूस लढा उभारू नये यासाठी सत्ताधारी मंडळी आणि सरकारचे दलाल खोट्या अफवा पसरवून तसेच चुकीचा संदर्भ देऊन कसं उपद्रव माजवत आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी …
Read More »उदय सामंत यांचे आश्वासन, जर्मनीतल्या उद्योजकांसाठी एमआयडीसी मध्ये ५०० एकरचा भूखंड जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देऊ
आज जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम महाराष्ट्र युरोप बिजनेस फोरम (MSBF) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली. ही सुरुवात मराठी संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली. जर्मनीतही मराठी …
Read More »उदय सामंत यांची माहिती, जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी पाच तालुक्यांचा डी प्लस वर्गवारीत समावेश
जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १० तालुक्याचे वर्गीकरण होऊन ते डी+ वर्गवारीत झाले. पुढील एक महिन्यात नवीन औद्योगिक धोरण जाहीर होणार असून या धोरणात जळगाव जिल्ह्यातील शिल्लक पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत दिली. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव …
Read More »
Marathi e-Batmya