Tag Archives: उपमुख्यमंत्री

अजित पवार यांची आशा, विकासात्मक दृष्टिकोन ठेवावा भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री पवार यांची भेट

भारतीय प्रशासन सेवेतील (आय.ए.एस) सन २०२४ च्या तुकडीतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी नवोदित अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामकाजातील मूलभूत तत्त्वे आणि सध्याच्या नवीन तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन केले. विशेषतः विकासात्मक दृष्टिकोन, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतले २१ निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक आज झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळात एकूण २१ निर्णय घेण्यात आले. यातील काही निर्णय हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून घेण्यात येत आले आहेत. त्यामुळे आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही निवडणूका …

Read More »

हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड या उपमार्गिकांना शासनाची मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री तथा …

Read More »

‘सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ महिलांमध्ये होणारा सर्व्हायकल कॅन्सर दुसऱ्या क्रमांकाचा आजार

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ.संतोष भोसले, सिरम …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले की, संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज समाधी मंदिराचे उद्घाटन व भक्तनिवासाचे लोकार्पण

वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करताना म्हणाले की, “अजित पवार, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का? असा सवालही यावेळी केला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आजही अवकाळी पावसामुळे, …

Read More »

अजित पवार यांचा पुढाकाराने नाशिक, अमरावतीसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने आता नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आले आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. उपमुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल

‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची “सायकलचे शहर” ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासन, पुणे …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे निर्देश अधिछात्रवृत्ती आणि शिष्यवृतीची दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करा उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत नियुक्त समितीने तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या स्वायस्त संस्थांमध्ये …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे मत, आरएसएसवर बंदी घालण्याचे वक्तव्य दुर्दैवी संघ नेहमी राष्ट्रसेवेसाठी तत्पर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. देशावर संकट कोसळले की आरएसएस नेहमी मदतीसाठी पुढे सरसावते. आरएसएसवर बंदी घालण्याबाबतचे वक्तव्य हे दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणाऱ्या …

Read More »