Tag Archives: एकनाथ शिंदे

मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल- सुधीर जाधव पती पत्नीचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या – मनसे माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी सोमवारी (ता.२९) आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनामध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी पार पडला. या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी स्नेहल व सुधीर जाधव …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, काळोखे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर शिवसेना स्वस्थ बसणार नाही काळोखे कुटुंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सांत्वनपर भेट

रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने ग्राम, तालुका, जिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी कर्मयोगी २.० आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबविणे, राज्यातील २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा निर्णय …

Read More »

नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार

नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास पात्र …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा टोला, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिले घरात बसवणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राइक रेट भक्कम राहिला असून, आम्ही जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन गेलो, स्थानिक प्रश्नांवर भर दिला आणि कोणावरही टीका केली नाही, त्यामुळेच जनतेने आम्हाला भरभरून यश दिले, असे ठाम मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधा-यांकडून ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी कामगारांना कोणाच्या दबावाखाली सोडले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वाटोळं होत असल्याची नवनवी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. शासकीय जमिनींच्या विक्रीच घोटाळे, टेंडरमधील कमिशन, समृद्धी शक्तीपीठ महामार्गातील भ्रष्टाचारातून कमावलेलं पैसा कमी पडू लागल्याने सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांमार्फत अंमली पदार्थांचे कारखाने काढून राज्यातील युवा पिढीला व्यसनी बनवत आहेत. नगरपालिका निवडणुकीत या ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेल्या …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, विदर्भाच्या वैभवासाठी कटिबद्ध, मुंबई फास्ट..महाराष्ट्र सुपर फास्ट अंतिम आठवडा उत्तरात घेतला विकास कामांचा आढावा

‘सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. मुंबईतील पुनर्विकासातील अडथळे दूर करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या २३ जानेवारी पासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईकरांसाठी या योजना आणून बाळासाहेबांच्या चरणी …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार ‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड, एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामधील लाभार्थ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी १७ ठिकाणी एसआरए समुह पुनर्विकास प्रकल्पाच्या घोषणेसोबतच ‘एसआरए अभय योजने’ला डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ, तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी ‘एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटींची संख्या वाढविण्याच्या घोषणांचा समावेश आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या ओसीसाठीच्या …

Read More »

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबई पागडीमुक्त सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली

मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून …

Read More »

जयंत पाटील यांनी मुद्दा उपस्थित करताच तटकरेंच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांची योजना कधीच बंद होणार नसल्याची सारवासारव

नागपूरातील हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, लाडकी बहिण योजना आता सरकारला झेपत नसल्यानेच आता लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन सुरु केले आहे. तसेच केवायसी करणे आदी नियमांची शोधाशोध तुम्ही सरकारने सुरु केली आहे. आता आऊट ऑफ कंट्रोल होत असल्यानेच सरकारने या गोष्टी …

Read More »