एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसेच कार्यशाळेच्या व बसस्थानकांच्या छतावर ‘ सौरऊर्जा प्रकल्प ‘ उभारुन त्याद्वारे वर्षाला सुमारे ३०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्याद्वारे वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपये किंमतीची वीजनिर्मिती करण्याचा महत्वकांक्षी ‘ सौर ऊर्जा हब ‘ उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची परिवहन …
Read More »प्रताप सरनाईक यांचा इशारा, मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही… मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
एसटी ही महाराष्ट्राची ‘ लोकवाहिनी ‘ आहे . दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात. त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याला …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आदेश, एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवा चांगले उत्पन्न देणाऱ्या संस्थांची निवड करा
एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे अशा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव …
Read More »राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश, सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृहे बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश
राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या …
Read More »एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन्न…. तिकीट दरवाढीला मान्यता द्या- सरकारकडे एसटीचा प्रस्ताव
दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी …
Read More »दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोंबरला पगार रोखून धरलेली रक्कमही अदा करण्याचे निर्देश
दिवाळी सणानिमित्त आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचा पगार चालू महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचे वेतन जारी करण्यात यावे असे आदेश एसटी महामंडळाने आज जारी केले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी ऑक्टोंबर महिन्याचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा …
Read More »एसटी कृती समितीकडून कर्मचाऱ्यांचा संप; २०० डेपोतील एसटीच्या वाहतूकीला ब्रेक शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यावर तोडगा निघेपर्यंत संप सुरुच राहणार
राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सुविधा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यावरती अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीचे निमंत्रक मुकेश तिगोटे यांनी माहिती दिली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची हाक दिल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सणासुदीच्या तोंडावर …
Read More »एसटी महामंडळाकडून बस खरेदीचे कंत्राट मिळताच अशोक लेलॅण्डच्या शेअर्सचे भाव वाढले एक हजार कोटी रूपयांचे कंत्राट अशोक लेलॅण्डला मिळाले
देशांतर्गत ऑटोमेकर अशोक लेलँड लिमिटेडने सोमवारी जाहीर केले की त्यांनी ९८१.४५ कोटी रुपयांच्या वायकिंग प्रवासी बसेसच्या २,१०४ युनिट्ससाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) कडून एकल सर्वात मोठी पूर्ण तयार केलेली बस ऑर्डर मिळविली आहे. हिंदुजा ग्रुपच्या भारतीय फ्लॅगशिपने सांगितले की, ऑर्डर जिंकल्याने बस सेगमेंटमध्ये त्याचे वर्चस्व आणखी मजबूत करण्यात …
Read More »अतुल लोंढे यांची मागणी,… एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा
लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी …
Read More »
Marathi e-Batmya