Tag Archives: काँग्रेस

प्रियांका गांधी वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्राचा राजस्थानात साखरपुडा अविवा बेग हिच्याशी नव वर्षाच्या सुरुवातीला होणार

राजधानीत राजकीय घडामोडींची चर्चा सुरू असताना, एका खाजगी कौटुंबिक सोहळ्याची तयारी शांतपणे सुरू आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा त्याच्या दीर्घकाळाच्या मैत्रीण अविवा बेगसोबत साखरपुडा करणार आहे, असे कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. हा साखरपुडा राजस्थानमध्ये दोन ते तीन दिवसांचा एक साधा समारंभ …

Read More »

मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची यादी जाहिर राष्ट्रीय समाज पक्षाकडूनही ६ उमेदवारांची यादी जाहिर

राज्यातील महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपत आलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकिय पक्षांकडून आता त्यांच्या आघाड्या-बिघाड्या जाहिर करण्याची लगबग सुरु झाली आहे. तसेच प्रत्येक पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आलेली असतानाच आता उमेदवारही जाहिर करण्यात येत आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची तर काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या राष्ट्रीय …

Read More »

पीएसआय PSI_वयवाढ : काँग्रेसचा महायुती सरकारला थेट व अंतिम इशारा युवकांवर अन्याय आणि फसवणूक

पीएसआय PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदासाठी वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी हजारो उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र महायुती सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, दिरंगाईमुळे आणि निर्णयक्षमता अभावामुळे आजही या अत्यंत संवेदनशील व न्याय्य मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी हजारो पात्र, मेहनती आणि प्रशिक्षित तरुण वयोमर्यादेबाहेर फेकले गेले असून त्यांच्या …

Read More »

मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस व ‘वंचित’ची आघाडी वंचित ६२ जागा लढवणार; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात आज आघाडीचा निर्णय झाला. मुंबईत वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढणार आहे. राज्यातील इतर २८ महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसे अधिकार दोन्ही पक्षाने दिलेले आहेत. आज काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी आघाडीचा निर्णय झाला, याला विशेष महत्व …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, मनरेगातील गांधींचे नाव व कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस कटिबद्ध काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिवस टिळक भवन मध्ये उत्साहात साजरा

देशात आज जात, धर्म, भाषा व पंथ यावरून समाजा समाजात विभाजन केले जात आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सत्ताधारी भाजपा सरकार करत आहे. देशासमोर आज मोठे संकट उभे ठाकले असून या परिस्थितीत देशाला तारणारा एकच विचार असून तो काँग्रेसचा विचार, त्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या पहिल्या २० उमेदवारांच्या यादीत या उमेदवारांना संधी प्रकाश यलगुलवार यांच्या सुनेला, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रतिक्षा प्रविण निकाळजे यांना पुन्हा उमेदवारी

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस जय्यत तयारीनिशी उतरत आहे. आज सोलापूर महानगरपालिकेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते, तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा चांगला संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न सुरु असल्याची माहिती …

Read More »

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले. टिळक भवन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, लोकसभेप्रमाणे महागरपालिकेतही काँग्रेसला विजयी करा समाजवादी पार्टी, एमआयएम, एनसीपी, भाजपा, व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्ष सर्वांना साथ देणारा पक्ष आहे, विविधतेत एकता अबाधित ठेवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे तर दुसरीकडे भाजपाचे राजकारण मात्र तोडफोडीचे, जाती धर्मात भांडणे लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले, नगरपालिका निवडणुकीतही चांगले यश मिळाले, धुळ्यातून शोभाताई बच्छाव यांना लोकसभेत पाठवले आता धुळे महानगरपालिकेत …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा विश्वास, काँग्रेस पक्ष नेहमीच उत्तर भारतीयांच्या पाठीशी सक्षमपणे उभा मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई महानगरपलिका निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलने सात कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे आणि स्वयंरोजगाराचे रक्षण करण्यासह अनेक प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत. शारदा ज्ञानपीठ इंटरनॅशनल स्कूल, दत्त मंदिर रोड, मालाड (पूर्व) येथे आयोजित जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »