हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते कृपाशंकर …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती
पुणे येथील कथित जमीन अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश आज जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुणे शहरातील मुंढवा …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टी वॉररुमसोबत जोडलेले कार्यकर्त्यांशी संवाद व्हाट्सअप ग्रुपमधूनच, प्रत्येक जिल्ह्यात तीन नेत्यांची समिती
भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होतो, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ग्रूपवर त्यावर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरविली …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल ·योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्र्यांचे कौतुक
महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही महिन्यांमध्ये विविध लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. या माध्यमातून होत असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा महसूल विभाग येत्या काळात देशात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपत्तीग्रस्तांच्या घरातही …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला चालना ११,०१५ चौ.मी. जमीन पुणे महापालिकेला प्रदान
पुणे शहरातील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यासाठी महसूल व वन विभागाने पुणे महानगरपालिकेला ११,०१५ चौरस मीटर (१ हेक्टर १०.१५ आर) इतकी शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यास मंजुरी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला नवे बळ मिळणार असून, मुळा-मुठा नदीच्या विकासाचा …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देणार महसूल सेवकांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न
महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करुन त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूलमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्दावर सकारात्मक चर्चा झाली. …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, पाणंद रस्ते कामांना गतीसाठी आमदारांच्या समितीला अधिकार बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना' महत्त्वाची
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन कार्यवाही करत असून दिवाळीपूर्वी लाभ देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी व ग्रामीण भागासाठी ‘बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ महत्त्वाची आहे. यातील पाणंद रस्ते कामांना गती मिळावी यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विधानसभा मतदारसंघ स्तरावरील समितीला अधिकार देण्यासाठी तरतूद करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांसाठी जागा घ्याव्यात १५ दिवसात जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करा
राज्यात इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली वसतिगृह काही ठिकाणी भाडे तत्त्वावरील जागेत आहेत. वसतिगृहांसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच पुढील पंधरा दिवसांच्या आत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असेही यावेळी सांगितले. महसूल …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकारीच जबाबदार १० ऑक्टोबरचा मोर्चा रद्द करावा; मुख्यमंत्र्यांची ओबीसी शिष्टमंडळाला विनंती
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्याचबरोबर, राज्यातील पूरस्थिती …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे माहिती, शेतकऱ्यांना सावरू; मदतीसाठी लवकरच योजना • आपत्तीग्रस्तांना सरकारची सढळ मदत • उद्योजक, संस्थांनी सीएसआर फंड द्यावा
पुराने अस्मानी संकटात सोडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, कष्टाने उभारलेले संसार पुन्हा सावरण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून परतल्यानंतर योजना नक्की केली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीचा निर्णय घेऊ, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुंबईत पत्रकारांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्याचा जवळपास अर्धा भाग पूरग्रस्त झाला असून, पूरग्रस्त कुटुंब व …
Read More »
Marathi e-Batmya