Tag Archives: जयंत पाटील

जयंत पाटील यांची मागणी, शासनाने शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये अशी विधानसभेत केली मागणी

नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व  शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. यावेळी सभागृहात बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकर्‍यांनी ६.५ किलोमीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी २.५ कोटी …

Read More »

गिरीश महाजन यांचे आंदोलनकर्त्या शिक्षकांना आश्वासन, वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात २०% वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाईल

पाच जुलै पासून आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना आज अखेर काही प्रमाणात दिलासा राज्य सरकारने दिला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आज आझाद मैदानावर जात शिक्षकांच्या बँक खात्यावर वाढीव वेतन पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांना पाच जुलै पासून वाढीव वेतन …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, राज्यावरील कर्जाचा आणि तिजोरीवरील वित्तीय भार मर्यादेतच खर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल

पुरवणी मागण्यांचा निधी हा पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदाने, केंद्र सरकारच्या विकास योजनांपोटी राज्याचा हिस्सा, रस्ते, रेल्वे, पुल, मेट्रो, भुयारी मार्ग आदी कारणांसाठी खर्च करण्यात येणार असल्याने त्यातून राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडणार आहे. राज्याचा कारभार आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन करीत सुरु आहे. राज्याच्या तिजोरीवरील वित्तीय भारही मर्यादेत आहे. राज्याची आर्थिक …

Read More »

विरोधी पक्षनेते पदावरुन विधानसभेत विरोधकांचा सभात्याग प्रश्नोत्तराच्या तास सुरु होण्याआधीच भास्कर जाधव यांच्याकडून बोलायला सुरुवात

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होऊन आज दुसरा दिवस सुरु झाला. सकाळी प्रश्नोत्तराचा तासाची घोषणा करताच शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांसदीय लोकशाही राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार आहे पण विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरील …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, राज्यावरील आर्थिक बोजा वाढला, आर्थिक संतुलन ढासळलं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांवरून सरकारला धरले धारेवर

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारला पहिल्या दिवशी धारेवर धरले आहे. राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे राज्यातील गरिबांवर, …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल,…मग हजारो कोटी जातात कुठे ? मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच

मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली येत आहेत. पैसे तर कमी होतोय पण शहरात नेमकी काय नवीन उभं राहतेय हा प्रश्न आहे. मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे …

Read More »

जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे वक्तव्य करताच कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमातच नकारघंटा २६ व्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरून चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय झालेला असल्याने ७ वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून जयंत …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा विश्वास, पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच वाढणार

यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. ‘लडेंगे और जितेंगे’, असा विश्वास पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करत महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच पुढे जाणार आहे असा …

Read More »

जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले मनापासून आभार लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल आभार मानले

गेली ३ वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या नव्हत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली ३ वर्षे प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत, ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांची घोषणा एक महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणुका प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा अंतरिम आदेश दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, होत्याचं नव्हतं झालं तर येणा-या पिढीला आपण काय उत्तर देणार? महाराष्ट्र दिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य़क्ष जयंत पाटील यांचं भावनिक पत्र

सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक भावनिक पत्र प्रसिद्ध केले. त्यात जयंत पाटील म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. …

Read More »