Tag Archives: देवेंद्र फडणवीस

जोड खतांचे गौडबंगल बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभागृहात उघड कृषीमंत्र्यांकडून आश्वासन; कंपन्यांना समज देणार

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने दिली जात आहेत, शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, इर्शाळवाडी दुर्घटनेची सविस्तर माहिती ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती

रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीतल्या ठाकूरवाडीवर रात्री झोपेत असलेल्या आदिवासांच्या वाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला. गतवर्षी रायगड जिल्ह्यातीलच माळीण येथे अशीच दुर्घटना घडून अनेकांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसानंतर गावात दरड कोसळल्याची ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये जवळपास २५ ते ३० घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचं सांगितलं जात आहे. या …

Read More »

भास्कर जाधव यांनी निषेध करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक गोड केक खाऊ घाला प्रश्न आणि लक्षवेधीवर बोलण्यास वेळ न दिल्याने भास्कर जाधव यांनी केला अध्यक्षांचा निषेध

राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये किरीट सोमय्या प्रकरण व नीलम गोऱ्हेंच्या अपात्रतेचा मुद्दा गाजल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात …

Read More »

अबू आझमी यांची घोषणा, मी वंदे मातरम् म्हणणार नाही; विधानसभेत गदारोळ १० मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब

विधिमंडळात मागील दोन दिवसात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आणलेला अपात्रतेचा मुद्दा आणि किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्यावरून सभागृहात राजकिय खडाजंगी रंगली. त्यानंतर आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मी वंदे मातरम् म्हणणार नाही असे वक्तव्य केल्याने सत्ताधारी बाकावरील भाजपा शिंदे गटाच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, सर्व पोलिस ठाण्यात स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष दहशतवाद विरोधी पथक 'समन्वय एजन्सी' म्हणून काम पाहणार

राज्यातील अमली पदार्थांच्या व्यापार आणि प्रसारास आळा घालण्यासाठी कडक भूमिका राज्य शासनाने घेतली असून सर्व पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी संबंधितांना शिक्षा होण्यासंदर्भात ते पदार्थ बाळगण्याची मर्यादा कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती करणार असल्याची …

Read More »

नीलम गोऱ्हे यांना उपसभापती म्हणून…देवेंद्र फडणवीस म्हणाले, तो नियम लागू होत नाही उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणता येणार नसल्याची स्पष्टोक्ती

शिवसेना ठाकरे गटात असलेल्या विधान परिषदेच्या आमदार तथा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून विरोधकांनी उपसभापती हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे अशा पदावर असलेल्या व्यक्तीने राजकिय पक्षात प्रवेश करू नये या मुद्यावरून काल विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. तसेच आजही याविषयीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. …

Read More »

किरीट सोमय्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केली सखोल चौकशीची घोषणा अंबादास दानवे, अनिल परब यांच्या मागणीनुसार सखोल चौकशी करण्याचे दिले आश्वासन

ईडी सारख्या तपास यंत्रणांचा धाक दाखवित आणि भाजपा पक्ष संघटनेत आणि विधान परिषद, राज्यसभा आदी ठिकाणी पद देण्याचे आमिष दाखवित भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महिलांचे लैगिंक शोषण करत असल्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओवरून विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( …

Read More »

भास्कर जाधव म्हणाले, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोक टेकवून मी पुन्हा…. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला टोला

विधानपरिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. तो ठराव चर्चेला येऊन त्यावर मतदान झालं पाहिजे, असं आमदारांचा आग्रह आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्या गटात नीलन गोऱ्हे यांनी प्रवेश केल्यानंतर दरेकांनी अविश्वासाचा ठराव मागे घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर अविश्वासाचा ठराव …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्री, मुख्य सचिवांची… हिंसाचार हे इंटेलिजन्स फेल्युअर असल्याचा केला आरोप

बरोबर पाच वर्षभरापूर्वी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगांव भीमा येथील विजयीस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून गेलेल्या दलित समाजावर अचानक हल्ला करून हिंसाचार करण्यात आला. त्याचे पडसाद त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. याप्रकरणाची सखोल चौकशी कऱण्यासाठी स्थापन कऱण्यात आलेल्या आयोगासमोर वंचित आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांना आज बोलाविण्यात आले होते. यावेळी प्रकाश …

Read More »

विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापती पदावर विरोधकांनी घेतला आक्षेप अखेर विरोधकांचा सभात्याग

विधान परिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच संपलं. नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला. सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे असं ते म्हणाले. जे सभागृह आपण चालवत असताना ज्या या पदावर बसल्या त्यावेळी त्यांचा पक्ष नसतो असं जयंत पाटील …

Read More »