Tag Archives: पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांची माहिती, पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे पशुपालकांची उत्पन्न वाढ राज्यातील पशुपालकांना मिळणार वीजदरात सवलतीचा लाभ

राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात सवलतीचा लाभ देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून यामुळे पशुपालकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री …

Read More »

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभाग

दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे, हा विचार करून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज एका आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमात अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या. …

Read More »

विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात राबविणार दुग्धविकास प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत बैठक

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यामध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना दूध संकलन व चारा …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची मागणी, हेक्टरी ७० हजार आणि शेतीला नोकरीचा दर्जा द्या बीडच्या नारायण गडावरून पहिल्याच दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांची मागणीही आणि इशारा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायण गडावर पहिलाच दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. तसेच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यासाठी लढाही पुकारला आहे. मनोज जरांगे …

Read More »

मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला पूरग्रस्त भागातील पशुधन हानीचा व सुरक्षिततेचा आढावा पूरग्रस्त भागात फिरती पशुवैद्यकीय पथके सक्रिय ठेवून तात्काळ सेवा द्या

राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पशुधनाच्या झालेल्या हानीचा व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे मृत जनावरांच्या मालकांना योग्य ती शासकीय मदत मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महसूल विभागाशी समन्वय साधावा, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात जनावरांसाठी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,ओबीसींवर अन्याय होणार नाही; खोट्या नोंदी नकोच चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास आक्षेप

ओबीसींच्या मनात आपल्यावर अन्याय होईल अशी भीती आहे. पण, तसे काही होणार नाही. कुणबी नोंदी आहेत,त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळणार असून त्यासाठी प्रमाणपत्र, कुणबी नातेसंबंध, ग्रामसमिती, तहसीलदारांच्या स्तरावरील समितीचा अहवाल घ्यावा लागणार आहेत. वंशावळ जुळल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच दाखला देण्यात येईल. फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची …

Read More »

अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तात्काळ दखल; पंकजा मुंडे पोचल्या थेट पाहणीला अनधिकृत भराव करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जागेवर जाऊन पाहणी करत गंभीर स्थितीची नोंद घेतली. बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरील भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले. आमदार अनिल परब यांच्या …

Read More »

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान …

Read More »

पंकजा मुंडे यांचे विधानसभेत निवेदन, पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा असा निर्णय घेणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य

पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी …

Read More »

पंकजा मुंडे यांची घोषणा, स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 राबविणार १ एप्रिलपासून अभियानाची सुरुवात तर ३१ मार्च २०२६ पर्यंत राबविणार

पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे. राज्यस्तरावर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यानंतर आता १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ याकालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरण …

Read More »