Tag Archives: पालकमंत्री

पंकजा मुंडे यांचे बीड प्रशासनाला आदेश, राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करा जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलासाठी उपलब्ध करून द्या

प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीडच्या जिल्हा प्रशासनाला दिले. जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही देत प्रदुषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांची …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार "भारत, भारती"ला पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार असून आज राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय …

Read More »

सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, मुंबई उपनगरांना ‘मिनी बांग्लादेश’ बनू देणार नाही मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न : लोढा यांच्या महत्वाच्या सूचना

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक २७ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली. यावेळी सह पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याची सुरक्षा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने काही महत्वाच्या सूचना केल्या. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी, मुंबईचे आकर्षण बाळगून विविध मार्गाने होणारी बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी रोखणे …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, पालकमंत्री पदाबाबत कधी नव्हे ती ऐवढी चर्चा का? पालकमंत्र्यांनी लवकर जबाबदारी घेऊन कामाला लागावं

महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांबद्दलची अस्वस्थता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आहे. दिल्लीतील अनेक खासदार, विचारवंत आणि माध्यम विचारतायत की महाराष्ट्रात चाललंय काय ? अशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीडमधील हत्येबाबत दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण… कोल्हापूर येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ

आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याच्या भावनेतून राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दूरदृश्य …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम पर्याय सुचवा पुढील ५० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रस्ताव पाठवा

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट द्यावी. भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम व्यवहार्य …

Read More »

दीपक केसरकर यांची माहिती, मुंबईसाठी ४९० कोटी रूपयांचा निधी स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

मुंबई हे राजधानीबरोबरच जागतिक दर्जाचे शहर आहे. शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करुन संबंधित सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर …

Read More »

अजित पवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेत केली घोषणा, पालिका आणि सरकार मदत करणार एकता नगर आणि सिंहगड रोडवरील पाणी साचलेल्या ठिकाणी भेट

काल दिवसभर पडलेल्या पावसानंतर रात्रीपासून पुण्यात कोसळलेल्या पावसामुळे पुणे शहरात पुर परिस्थिती निर्माण झाली. एकाबाजूला पावसाचे पाणी आणि दुसऱ्याबाजूला खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सिंहगडरोडवरील एकता नगर आणि अन्य भागात जिकडे तिकडे पाणीच पाणी जमा झाले. एकता नगरमध्ये तर छातीपर्यंत पाणी जमा झाल्याचे पाह्यला मिळाले. यापार्श्वभूमीवर दुपारनंतर पालकमंत्री अजित …

Read More »

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंतचे आर्थिक सहकार्य

वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजावाडी हॉस्पिटल येथे जाऊन भेट दिली. सद्यस्थितीमध्ये राजावाडी हॉस्पिटलमध्ये १ व्यक्ती ICU मध्ये असून इतरांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा होत असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर

नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक …

Read More »