Breaking News

Tag Archives: पुणे

अजित पवार यांचे आदेश, शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम पर्याय सुचवा पुढील ५० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रस्ताव पाठवा

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट द्यावी. भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम व्यवहार्य …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, मला काय मिळाले यापेक्षा दुसऱ्याला काय देणार… वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य

वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या अभिष्टचिंतन, पुरस्कार प्रदान आणि वारकरी …

Read More »

एस चोकलिंगम यांचे आवाहन, भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचा अभ्यास करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशदा येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे व कोकण विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत यशदा येथे करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा व्यवस्थित अभ्यास करावा, असे …

Read More »

पुणे स्थित कॅरारो इंडियाचा आयपीओही बाजारात येण्याच्या मार्गावर १८२१ कोटी रूपयांचा निधीसाठी आयपीओ, सेबीकडे कागदपत्रे सादर

कॅरारो इंडिया, ऑफ-हायवे वाहनांसाठी ट्रान्समिशन सिस्टम बनवणारी पुणे स्थित कंपनीने १,८२१ कोटी रुपयांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग- आयपीओ IPO साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया- सेबी SEBI कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. . प्रत्येकी १० रूपये दर्शनी मूल्य असलेले समभाग ऑफर करणारा आयपीओ IPO, कॅरारो इंटरनॅशनल …

Read More »

बदलापूरप्रकरणी सरकारवर टीका करत शरद पवार यांनी दिली शपथ भरपावसात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केले आंदोलन

बदलापूर प्रकरणी राज्य सरकारच्या विरोधात आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने अटकाव केल्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमख नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. आंदोलनावेळी शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्ये-पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी यांना शपथ दिली. तसेच राज्यातील …

Read More »

पुण्याच्या बर्गर किंगने अमेरिकेच्या विरोधातील न्यायालयीन लढाई जिंकली ट्रेडमार्कची याचिकाही फेटाळून लावली

यूएस-स्थित बर्गर किंग कॉर्पोरेशनने पुण्यातील बर्गर किंग रेस्टॉरंटच्या विरुद्ध १३ वर्षे सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत पराभूत झाली असून जिल्हा न्यायालयाने ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप करणारा खटला फेटाळून लावला. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी १६ ऑगस्ट रोजी दिलेल्या न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणेस्थित रेस्टॉरंटला “बर्गर किंग” नाव वापरण्यापासून रोखण्याचा बहुराष्ट्रीय फास्ट-फूड चेनचा प्रयत्न आता …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्यासाठी नवीन धोरण एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील इस्टेट, शिवाजीनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक …

Read More »

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुणे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या आदेश धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे

भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, …

Read More »

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा विमा कंपन्यांशी बोलून नुकसानग्रस्तांना लगेच मदत द्या- मुख्यमंत्री शिंदे

पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील (ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश …

Read More »

भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ कोयना, खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरण क्षेत्रातील अतिवृष्टी

पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची …

Read More »