Tag Archives: प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भाजपा आता बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारा पक्ष बनतोय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावा

राज्यात महिलांची सुरक्षितता ही गंभीर चिंतेची बाब बनली असून, सत्ताधाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत तीव्र …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची पिंपरी-चिंचवडमध्ये मुस्लिम समाजासोबत बैठक नव्या समीकरणांची चर्चा, पिंपरीतील प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पिंपरी येथील ‘हॉटेल नमस्कार’ येथे पत्रकार परिषद घेऊन स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले आणि पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते, तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा चांगला संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न सुरु असल्याची माहिती …

Read More »

काँग्रेसच्या AICC नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले असून फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीमुळे ७० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत असून, हा विजय …

Read More »

महार वतन जमीन घोटाळ्यातील पीडीतांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट पुण्यातील पीडित दलित शेतकऱ्यांनी घेतली भेट

पुण्यातील मुंढवा परिसरातील ४३ एकर महार वतनाची १८०० कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे केवळ ३०० कोटी रुपयांना विकण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. तसेच याप्रकरणी अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राज्याच्या राजकिय वर्तुळात केंद्रस्थानी आले आहे. या पार्श्वभूमीवर महार वतन जमीन पीडित दलित शेतकऱ्यांनी आज पुण्यात वंचित बहुजन …

Read More »

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पार पडणार संविधान सन्मान सभा शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर

२५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा भरवली जाणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या महासभेच्या वेळी शिवाजी पार्क तुडुंब भरले होते. लाखो लोकांनी संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एकदिलाने हाक दिली होती. त्या ऐतिहासिक गर्दीच्या साक्षीने उभा राहिलेला शिवाजी पार्क यंदा पुन्हा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, बिहार निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए)च्या विरोधात मतदान करा रशियाच्या तेलाचा फायदा सरकारला नाही, तर अंबानीच्या खासगी कंपनीला

आरएसएस-भाजपाला देशाचे संविधान बदलयाचे आहे. देशाला वाचवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि पेरियार स्वामी यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आम्ही या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए) युतीच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करताना म्हणाले की, “अजित पवार, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का? असा सवालही यावेळी केला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आजही अवकाळी पावसामुळे, …

Read More »

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जनआक्रोश मोर्च्यास उसळला जनसागर आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद शहरात ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही, हजारोंच्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी झाला. यावेळी, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, राज्य समिती …

Read More »

औरंगाबादमध्ये आरएसएस कार्यालयावर मोर्चा निघणारच; वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका पोलिस प्रशासनाला दोन पर्याय

वंचित बहुजन आघाडीने आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाने या मोर्चाचे ठिकाण बदलण्याची विनंती करत, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा असा प्रस्ताव दिला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचा हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला आहे. औरंगाबाद पोलीस प्रशासनाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना संपर्क …

Read More »