Tag Archives: प्रज्वल रेवण्णा

न्यायालयाचा निर्णय, बलात्कार प्रकरणी प्रज्वल रेवण्णास जन्मठेप आणि ११ लाखाचा दंड विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय

घर कामगार महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यास विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी (१ ऑगस्ट २०२५) दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावत ११ लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे. प्रज्वल रेवण्णा यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. ११ लाख रुपये दंडाची रक्कम बलात्कार पीडितेला भरपाई म्हणून …

Read More »

न्यायालयाने एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यास बलात्कार प्रकरणी दोषी ठरविले शनिवारी शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात येणार

हासन येथील जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना माजी आणि विद्यमान खासदार आणि आमदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांसाठी विशेष सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध तीन बलात्काराचे आणि एक लैंगिक छळाचे प्रकरण आहे आणि हा पहिलाच खटला आहे …

Read More »

प्रज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणाचा निकाल बेंगळुरू ट्रायल न्यायालयाने राखून ठेवला ३० जुलैला अंतिम निकाल

जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे निलंबित नेते प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्धच्या बलात्कार प्रकरणात शुक्रवारी बेंगळुरू येथील एका ट्रायल कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यांच्या मोलकरणीवर वारंवार बलात्कार केल्याचा आणि त्या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. ३० …

Read More »

प्रज्वल रेवण्णाला जर्मनीहून परतताच एसआयटीने केली अटक, ६ जून पर्यंत कोठडी केंम्पेगौडा विमानतळावर उतरताच अटक, विशेष न्यायालयात केले हजर

अनेक महिलांचे लैगिंक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग करत असल्याच्या आरोपावरून जर्मनीत पळून गेलेला जनता दल सेक्युलरचा खासदार प्रज्वल रेवण्णा आज पहाटेच्यावेळी केंम्पेगौडा विमानतळावर उतरला. केम्पेगौडा विमानतळावर प्रज्वल रेवण्णा हा उतरताच त्यास कर्नाटक पोलिसांच्या एसआयटी पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून बेंगळुरू न्यायालयात शुक्रवारी बलात्काराच्या आरोपाखाली हजर …

Read More »

प्रज्वल रेवण्णाने व्हिडिओ जारी करत काँग्रेसवर आरोप, पण मी ३१ मे पूर्वी येणार एसआयटीच्या नोटीसीनुसार हजर होणार

कर्नाटकचे खासदार तथा जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते प्रज्वल रेवण्णा, यांच्यावर घरातील घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करत इतर अनेक महिलांचे लैगिंक छळ केल्याचा आरोप ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळात करण्यात आले. त्यानंतर प्रज्वल रेवण्णा याच्या लैंगिक छळाचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले. मात्र प्रज्वल रेवण्णा हे मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी …

Read More »

एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला शेवटचा इशारा भारतात परत ये आणि कुटुंबाच्या रागास सामोरे जा

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल सेक्युलर आणि भाजपा युतीचे उमेदवार तथा माजी पंतप्रधान एच डी देवेंगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी प्रज्वल रेवण्णा विदेशात पळून गेल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा याचे वडील एच डी रेवण्णा याच्यासह …

Read More »