Breaking News

Tag Archives: मंत्रिमंडळ बैठक

सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करणार सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेत राज्यातील सहा हजार किमी रस्ते डांबरीकरण करण्यात येणार होते, मात्र त्याऐवजी या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित ३६ हजार ९६४ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार २८ हजार ५०० कोटी खर्च अपेक्षित होता. …

Read More »

विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकास प्रकल्प-२ ला गती देणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४९ कोटीच्या खर्चास मान्यता

विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्प्पा-२ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी १४९ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी ४२ लाख इतकी असून यापैकी १७९ कोटी १६ लाख हिस्सा हा शेतकरी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे प्रमुख घेतले निर्णय १३ विषयावर घेतला निर्णय

विधानसभा निवडूकांना कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसा राज्य सरकारकडून राज्यातील विविध घटकांना आणि खुष करण्याचा आणि केंद्राच्या धोरणाप्रमाणे निर्णय घेण्याचा सपाटाचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये सिंचनाचा निर्णय, प्रकल्प बाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय, लहान शहरातील विकास प्रकल्पांसाठी कर्ज उभारणीस …

Read More »

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ११ कोटी ३४ लाख ६० हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. सध्या मंत्रालयातल्या …

Read More »

दिवाळी सुट्टीचा असर मंत्र्याच्या मनावरून उतरेना, मंत्रिमंडळ बैठकीचेही भान राहिना

वास्तविक पाहता दिवाळीचा सण मागील आठवड्यात सुरु झाला. तो या आठवड्याच्या मध्यापर्यंत होता. मात्र आगामी निवडणूकीची धाकधुक हृदयात ठेवत अनेक सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी मतदारसंघातच ठाण मांडले. त्यातच राज्यात मराठा विरूध्द ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीला तब्बल १६ मंत्र्यानी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. …

Read More »

महाराष्ट्र बोव्हाइन ब्रीडिंग अधिनियम करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यातील शेतकरी आणि पशुपालक यांच्यासह एकूणच जनतेच्या सर्वांगीण हिताचा निर्णय घेत राज्य शासनाने पशुउत्पादकत्ता व गुणवत्तेत वाढ होण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे. गाय व म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाकरिता गोठीत वीर्य निर्मिती, प्रक्रिया, साठवण, विक्री, वितरण आणि प्रत्यक्ष कृत्रिम रेतन करणे, तसेच सहाय्यक पुनरुत्पादक तंत्र आणि या संबंधित सर्व बाबींसाठीचे नियमन …

Read More »

मोठी बातमीः कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला

मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्वाचे निर्णय मराठवाडा, विदर्भ आणि ठाणे विभागाच्या अनुषंगाने घेतले

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कृषी पंप जोडण्या, नागपूर येथे पाच कौटुबिक न्यायालय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यासह श्री मौनी विद्यापीठाच्या तंत्रनिकेतन विभागाला मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, यावेळी नांदेड येथील जिल्हा रूग्णालयात झालेल्या बालमृत्यूबाबत मात्र कोणतीही फारशी चर्चा झाल्याची माहिती ऐकिवात नसल्याचे मंत्रिमंडळातील एका सदस्याने …

Read More »