Tag Archives: मंत्री

आदिती तटकरे म्हणाल्या, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांचा उद्योग क्षेत्रात सहभाग

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले आहेत. अशा अनेक महिलांना महिला विकास मंडळाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण, अनुदान आणि भांडवल यामुळे महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी तसेच, उत्पादने बाजारपेठेत पोहोचविण्यासाठीही मोठा आधार मिळत आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, चाकणकर व झिरवाळांच्या प्रकरणानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गप्प का? महायुती सरकार अवैध व अनैतिक धंद्यांची बजबजपुरी, खरात प्रकरण व मंत्री झिरवाळांच्या VDO ने सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली

भोंदूबाबा अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लिल व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाच्चकी झालेली असताना राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह VDO सोशल मीडियावर व्हायरल होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नरहरी …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, टास्क फोर्सच्या अहवालानंतर सोशल मीडिया नियंत्रणाबाबत धोरण ठरणार लहान मुलांच्या संदर्भात तयार करणार ठोस धोरण

राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच ठोस धोरण किंवा कायदा तयार केला जाईल, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत सदस्य राजेश पवार यांनी सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, …

Read More »

मोबाईल टॉवर धोरणाबाबत आयटी सचिवांसोबत बैठक घेणार उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र ‘टॉवर पॉलिसी’ कशी तयार करता येईल याचा अभ्यास सुरु आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांसोबत याविषयाबाबत तातडीने बैठक आयोजित करण्यात येईल तसेच राज्यातील अनाधिकृत मोबाईल टॉवर्सचे सर्वेक्षण करण्यात येईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभा  …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क माफ आणि मुलांना ५० टक्के शिक्षण शुल्क माफ

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क माफ आणि मुलांना ५० टक्के शिक्षण शुल्क माफीचा लाभ देण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात जे महाविद्यालय शुल्क आकारतील त्या महाविद्यालयांवर कारवाई करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज …

Read More »

मंत्री उदय सामंत यांची माहिती, नियम व अटी पूर्ण केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

गुंठेवारी नियमितीकरणासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक असून संबंधित निकष पूर्ण करणाऱ्या प्रस्तावांनाच मंजुरी दिली जाते. आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक अटी पूर्ण न झाल्यास संबंधित प्रस्ताव नाकारले जातात. त्यामुळे गुंठेवारी विकास नियमित करण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत …

Read More »

आशिष शेलार यांचे आश्वासन, राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींच्या परीक्षा शुल्कासंदर्भात समिती मार्फत निर्णय अन्य राज्ये व केंद्र शासनाच्या प्रक्रियेचा समितीमार्फत अभ्यास करून निर्णय घेणार

राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये, यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. तसेच अन्य राज्यातील तसेच केंद्र शासनाच्या परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काचा समितीमार्फत अभ्यास करून शुल्क सवलतीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री …

Read More »

शंभूराज देसाई यांची माहिती, अग्निवीरांच्या पुनर्वसनाबाबत शासनाकडे समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय अग्निवारांच्या पुर्नवसनाबाबत धोरणच तयार नाही

अग्निवीर योजनेतंर्गत सेवा पूर्ण करून परतणाऱ्या जवानांच्या पुनर्वसनाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल ७ एप्रिलपूर्वी शासनाकडे प्राप्त होईल, अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य चंद्रदीप नरके यांनी अग्निवीर जवानांच्या पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. मंत्री शंभूराज देसाई …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, मुंबईतील २०१४ च्या पात्र यादीतील पथविक्रेत्यांना तात्पुरती जागा देणार विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले आश्वासन

मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाचा  निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय येईपर्यंत २०२४ च्या पात्र यादीप्रमाणे पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा (पिचेस) उपलब्ध करून देण्याचे महापालिकेला निर्देश देण्यात येतील अशी माहिती, मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. मुंबई शहरात पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी …

Read More »