Breaking News

Tag Archives: महायुती सरकार

नाना पटोले यांची टीका, महाराष्ट्र कर्जात डुबवला, २.५ लाख कोटींचे कर्ज लादले मुख्यमंत्र्यांकडील एमएमआरडीए तोट्यात कसे ?

महाभ्रष्टयुती सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला असून विकासाच्या नावाखाली कर्ज काढून भ्रष्ट मार्गाने मलिदा खाल्ला जात आहे. जागतिक बँकेसह इतर बँकांकडूनही कर्ज काढले आहे, महायुती सरकारने राज्यावर २.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे. एमएमआरडीए सारखा विभाग नफ्यात होता तोही आता तोट्यात आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतानाही घाट्यात …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, रस्ता एक फुट खचला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतू रस्त्याला भेगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते, पण महायुती सरकार तर १०० …

Read More »

राज्यातील महायुती सरकार ८ टक्के दराने २७ हजार कोटींचे कर्ज काढणार आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवत अर्धवट प्रकल्पासाठी कर्ज पण विभागाचा विरोध

लोकसभा निवडणूकानंतर आता जवळपास विविध निवडणूकांचा सपाटाच राज्यात सुरु झाला आहे. त्यातच आगामी दोन-तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून मात्र विकासाचा बोलबाला करत केंद्रातील महाशक्ती सोबत गेले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या तिन्ही नेत्यांच्या पक्षाला …

Read More »

महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्प सादर होणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

देशातील लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्याचा निकालही जाहिर झाला. मात्र ऐन मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने त्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करता आला नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती यापूर्वीच अजित पवार यांनी दिली होती. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, शेतक-यांच्या अडचणीत नॅाट रिचेबल असणा-या सरकारला… गावोगावी शेतक-यांनी सरकारच्या गलथानपणाचा पाढा वाचला

संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत असून माता भगिणींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. शेतक-यांनी पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या फळबागा वाळून गेल्या आहेत. जनावरांना चारा पाणी नाही. पशुधन जगवताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत जगण्याचा संघर्ष करणा-या शेतक-याला वा-यावर सोडून सरकार सुट्टीवर गेले आहे. मुख्यमंत्री मूळगावी आराम करत आहेत …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाभ्रष्ट युती सरकारची पोलखोल… कोस्टल रोडच्या बोगद्यातील गळतीची जबाबदारी निश्चित करून कारवाई करा

मुंबईच्या विकासात महत्वाचा असलेल्या कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे पहिल्याच पावसाळ्यात उघड झाले आहे. करोडो रुपयांच्या कोस्टल रोडचे दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले असून इतक्या लवकर दुरावस्था कशी काय झाली? हे कसले दर्जेदार काम याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला द्यावेच लागेल, असा प्रश्न विचारून बोगद्यात लागलेल्या गळतीची जबाबदारी निश्चित …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डींग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप करत …

Read More »