Tag Archives: महायुती सरकार

पीएसआय PSI_वयवाढ : काँग्रेसचा महायुती सरकारला थेट व अंतिम इशारा युवकांवर अन्याय आणि फसवणूक

पीएसआय PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदासाठी वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी हजारो उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र महायुती सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, दिरंगाईमुळे आणि निर्णयक्षमता अभावामुळे आजही या अत्यंत संवेदनशील व न्याय्य मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी हजारो पात्र, मेहनती आणि प्रशिक्षित तरुण वयोमर्यादेबाहेर फेकले गेले असून त्यांच्या …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ७५ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या पुरवणी मागण्या

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एक नवी प्रथा निर्माण करण्यात आली असून या प्रथेनुसार विधिमंडळाचे कोणतेही अधिवेशन असो पण त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या नव्या प्रथे प्रमाणे पुरवणी मागण्या सादर करायच्या आणि त्या अधिवेशन संपेपर्यंत मंजूर करून घ्यायचे. त्यानुसार राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नागपूरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ह्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा!

कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे, त्यात संवदेना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार; अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारुन वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील काय? असा सवाल शिवसेना …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही फसवेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असून हेक्टरी सरसकच ५० हजार रुपये दिले पाहिजे याचा …

Read More »

भाजपा महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे २० ऑक्टोबरला राज्यभर पिठलं भाकर आंदोलन फसवे पॅकेज देऊन शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार करणार

राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे आणि जे जाहीर केले तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ आहे आणि या परिस्थितीला शेतकरी विरोधी महायुती …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, शेतकऱ्यांची दिवाळी काळी, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं तरी दिलेली मदत ही तुटपुंजी

राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने मात्र १८०० कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. सरकारने जी मदत दिली आहे, त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे त्यामुळे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची खोचक मागणी, महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी गुंडांना वेळेत शस्त्र परवाने मिळावे म्हणून विशेष काऊंटरची व्यवस्था करावी

अकोल्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.२ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने हा काळा शासन निर्णय रद्द केलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. नागपूर …

Read More »

रोहित पवार यांचा आरोप, सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक आकडे फुगवणे दाखवले सरकारची घोषणा मोघम आणि फसवी

सरकारने हिवाळी अधिवेशन १० दिवसांचे न घेता ३ आठवडे घेतले पाहिजे. यामध्ये लोकांचे काय म्हणणे आहे, अडचणी ऐकाव्यात हे आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आणि कोरोना काळात नेहमी सांगत होते की अधिवेशन ३ आठवड्याचे पाहिजे, शेतकरी अडचणीत असताना हे अधिवेशन ३ आठवड्याचे का नसावे असा सवाल …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत

राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये २९ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त २५३ तालुके आणि २०५९ मंडळांमध्ये मदतीसाठी ६५ मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी ३१ हजार …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी अदानीला घाबरून पंतप्रधानांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देणे टाळले, विमानतळ उद्घाटनानंतर नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी करणार का?

अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसान भरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने …

Read More »