बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यासाठी १०५ कोटी खर्चाचे ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर झाले आहेत. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजूरीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून रोहा एमआयडीसी क्षेत्रात हे नवीन केंद्र उभे राहणार आहे. यामुळे रायगड …
Read More »अखेर माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ
विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठा विजय मिळवित पुन्हा एकदा राज्यात सत्तास्थानी विराजमान झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात राजकिय वादाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काल रात्री उशीरा …
Read More »छगन भुजबळ म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आजचा निर्णय अतिशय महत्वाचा एकाच आठवड्यात ओबीसी समाजासाठी दोन महत्वपूर्ण निर्णय
राज्यातील महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समिती,नगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील चार महिन्यात घेण्यात याव्यात. तसेच यासाठी सन २०२२ पूर्वी लागू असलेली ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेऊन निवडणूक घेण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे आज विशेष आनंद होत आहे. या …
Read More »मुख्यमंत्री पदाचा विषय येताच अजित पवार म्हणाले, शब्दच मागे घेतो म्हणजे विषय संपला १४५ आमदाराचं पाठबळ सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे
काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे झाले उपमुख्यमंत्री पद भूषविणारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठीचा योग काही जुळून येत नसल्याचे सांगत खंत व्यक्त केली. त्यावरून महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्ये-नेते यांच्याकडूनही यासंदर्भात भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच काय पक्षाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र महोत्सवातही प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, महायुतीने १०० दिवसात आका, खोके शब्द दिले काँग्रेसची उद्या रविवारी ४ मे रोजी परभणीत सद्भावना यात्रा व सोमवारी ५ मे रोजी संविधान बचाव यात्रा
महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले …
Read More »महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुमारंभ नद्यांचे पाणी आणि महापुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेली माती मंगलकलशातून मुंबईत आणणार...
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रे चा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते मोठया उत्साहात आज पार पडला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम …
Read More »बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली असून या बाबतच्या मान्यतेचे पत्र आज आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून …
Read More »विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेल्या टीकेवरून खा. सुनिल तटकरे यांची टीका सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या कुटुंबाचा अवमान हे भारतीय संस्कृतीला न शोभणारं
काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी केलेले विधान हे अत्यंत क्लेशदायक, निषेधार्ह व लांच्छनास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की, “लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबियांनी देशाच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचे योगदान दिले आहे. मास्टर …
Read More »संजय राऊत यांची टीका, त्या तिघांची वक्तव्ये ऐकली तर कॉमेडी शो माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा
राज्यातील एका शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही असा सवाल केला असता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जे घेता पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहता आणि कर्जमाफीच्या पैशानं करता काय असा सवाल साखरपुडे, लग्न… असा अजब सवाल करत शेतकऱ्यालाच सुनावलं. माणिकराव कोकाटे यांच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी …
Read More »दिनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरणी अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत …
Read More »
Marathi e-Batmya