Tag Archives: महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा, विधानसभा निवडणुकीत सूज उतरणार उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर साधला निशाणा

विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने सभागृहात चर्चेची तयारी ठेवावी. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलून केवळ हंगामा करण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात बोलावे. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हान बुधवारी सत्ताधारी पक्षाच्यावतीने विरोधकांना देण्यात आले. सत्ताधरी पक्षावर घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा आणि खोट्या नॅरेटिव्हचा …

Read More »

​उद्धव ठाकरे यांचा निर्धार, …विधानसभा निवडणूकीत १८० ते १८५ जागा जिंकणार संघटनात्मक बांधणीवर भर द्या!

लोकसभा निवडणूका नुकत्याच होऊन केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थानापन्न झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूका येऊ घातल्या असून त्यासाठी आणखी ४ ते ५ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून २८८ मतदार संघात संघटनात्मक बांधणी करून ताकदीने कामाला लागा, अशा आदेश शिवसेना उबाठा …

Read More »

पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज, राज्यात दोन-तीन दिवसात मान्सून ७ तारखेला बहुंताष भआगात मान्मसून कोसळणार

काही दिवसांपूर्वी मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात कधी दाखल होणार अशी विचारणा सातत्याने करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर पुणे हवामान वेधशाळेने अंदाज व्यक्त केला असून आगामी दोन दिवसात मान्सून दाखल होण्यास वातावरणीय परिस्थिती अनुकूल आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील ३ ते ४ तासात पावसाचे आमगन होणार असल्याचा इशारा पुणे …

Read More »

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे हे उमेदवार विजयी काँग्रेसचे ३, अजित पवार गटाचा एक, एकनाथ शिंदे गटाचा दोन, उबाठा गटाला २, शरद पवार गटाला ४

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे कल जाहिर होण्यास सुरुवात झाली. साधारणतः दिड वाजल्यापासून विजयी उमेदवार घोषित होण्यास सुरुवात झाली. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे संजय काका पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे पैलवान उमेदवार …

Read More »

महाराष्ट्रातील किती जागांवर महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवार आघाडीवर टेड्रिंगमध्ये महाविकास आघाडी ११ आणि महायुती ११ लोकसभा मतदारंसघात पुढे

लोकसभा निवडणूक २०२४ साठी १ जूनला सातव्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर आज ४ जूनला ५४३ लोकसभा मतदारंघातील जागांची मतमोजणी सुरु आज सकाळी सुरु झाली. महाराष्ट्रातही ४८ लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झाले. या ४८ मतदारसंघात काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीचे कोणते उमेदवार पुढे आणि कोणते उमेदवार मागे …

Read More »

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज राज्यातील ४८ मतदार संघात ४ जूनला मतमोजणी

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेट तसेच मतदारांच्या संख्येनुसार पुरेशा प्रमाणात मंडप व्यवस्था, प्रतिक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा …

Read More »

या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा मदतगार ठरणार?

लोकसभा निवडणूकीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यकर्त्यांच्या संमेलनात अब की बार ४०० पार चा नारा दिला. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ये काँग्रेस की गॅरंटी या शब्दाची नकल करत भाजपा सरकारऐवजी मोदी सरकार की गॅरंटी हा शब्दप्रयोगही राजकारणात आणला. मात्र मोदी …

Read More »

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणा

महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थनी आणावे, असे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी येथे केले. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार …

Read More »

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील प्रचार थंडावला

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पाडण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. …

Read More »