Tag Archives: माजी मंत्री

उच्च न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर शिक्षा स्थगितीसाठी याचिका दाखल पण न्यायालयाकडून जामीन

शासकिय कोट्यातून आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेले घर मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी देवळाली न्यायालयाने आणि तेथील वरच्या न्यायालयाने माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवित दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. त्या जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला …

Read More »

भाजपा नेते माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरी केला पक्ष प्रवेश

नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महाराkeष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन वळवी यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे …

Read More »

माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी, नवबौद्धांना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करा पावसाळी अधिवेशनात केली मागणी

आगामी जातीय जणगणनेमुळे निर्माण होणारा पेच लक्षात घेता नवबौद्ध समाजाला अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करावी अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी काल पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला नवबौद्ध समाजाच्या संवैधानिक हक्कांसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले. दीक्षाभूमीपासूनचा प्रवास आणि आजचा संघर्ष आमदार राजकुमार …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आजचा निर्णय अतिशय महत्वाचा एकाच आठवड्यात ओबीसी समाजासाठी दोन महत्वपूर्ण निर्णय

राज्यातील महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समिती,नगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील चार महिन्यात घेण्यात याव्यात. तसेच यासाठी सन २०२२ पूर्वी लागू असलेली ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेऊन निवडणूक घेण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे आज विशेष आनंद होत आहे. या …

Read More »

तेज प्रताप सिंह यादव याचे ऑन ड्युटी पोलिसाला आदेश, तुमका ठुमका लगाना है… होळीच्या दिवशीच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसालाच आदेश

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव नेते तेज प्रताप सिंह यादव यांनी शुक्रवारी पक्षाच्या समर्थकांसोबत होळी साजरी करताना, गणवेशातील एका पोलिस अधिकाऱ्याला गाण्यावर नाचण्याचे आदेश दिले आणि नकार दिल्यास त्याला “निलंबित” केले जाईल असा इशारा दिला. “ए सिपाही, एक गाणे बजाएंगे उस्पे तुमको ठुमका लगना है (मी गाणे वाजवीन, …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

राज्यातील गोर गरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन …

Read More »

सरकारने पाठ्य पुस्तकात नोटबुकची पाने समाविष्टचा निर्णय बदलला राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारने २०२३-२४ पासून इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नोटबुकची पाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता अपेक्षित लाभ न मिळाल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापूर्वीप्रमाणेच, पाठ्यपुस्तके बाह्य पानांशिवाय दिली जातील. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी या संदर्भात शासन …

Read More »

माजी मंत्री रोहिदास पाटील उर्फ दाजी यांच्या निधनाने अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व हरपले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शोकसंदेश

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना त्यांच्या मतदारसंघासह संपूर्ण खान्देशात दाजी या टोपणनावाने परिचित होते. रोहिदास पाटील यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. रोहिदास पाटील हे काँग्रेस विचाराचे सच्चे पाईक होते. काँग्रेसचा विचार त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सोडला नाही. रोहिदास पाटील यांच्या निधनाने सुसंस्कृत, संयमी, विनम्र …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये तीन …

Read More »

काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होईपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार आहेत, असे सूचक भाष्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी यावेळी केले. भाजपा …

Read More »