महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच एका राजकीय थरारनाट्यासारखे राहिले आहे; जेव्हा तुम्हाला वाटते की कथानक स्थिर झाले आहे, तेव्हा एक अनपेक्षित वळण सर्व काही उलथून टाकते. विशेषतः निवडणुकीचा हंगाम हा नाट्यमयता अधिकच वाढवतो. महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, निवडणुकीच्या चिंतेने असे काही साध्य केले आहे जे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील संरक्षण क्षेत्रालगतच्या व फनेल झोनमध्ये ‘हाउसिंग फॉर ऑल’ पुनर्विकास शक्य नसल्याने नवी योजना
संरक्षण क्षेत्रालगतच्या व फनेल झोनमधील मर्यादांमुळे पुनर्विकास रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने ‘हाउसिंग फॉर ऑल’ ही नवी योजना आणल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील अनेक भागांमध्ये संरक्षण क्षेत्रालगतची जमीन, फनेल झोन तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे पूर्ण क्षमतेने पुनर्विकास करणे शक्य होत …
Read More »एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबई पागडीमुक्त सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली
मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करा मुंबईच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याची केली मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. परंतु मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या तब्बल ११ लाख असून दुबार नावे असलेल्या मतदारांना शपथपत्र द्यावे लागणार आहे. हा मतदारांना नाहक त्रास असून यामुळे मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील हे सर्व टाळून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार याद्यातील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण झाले पाहिजे, असे नियोजन करण्यात यावे. विविध विकास प्रकल्प तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »सभापती राम शिंदे यांचे निर्देश, मुंबईमधील खासगी कोचिंग क्लास तपासणीसाठी समिती गठित करा तपासणी अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश
मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबईमधील खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा असे, निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता …
Read More »अमित शाह यांची ग्वाही, नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज ‘इंडिया मेरीटाईम वीक - २०२५’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई ही देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी नेस्को, गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम …
Read More »संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी उच्च न्यायालयाने स्थापन केली समिती न्यायालयाने स्थापन केली न्यायाधीश भोसले यांची समिती
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संरक्षण आणि संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अलिकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन केली [सम्यक जनहित सेवा संस्था विरुद्ध भारतीय संघ]. १९९५ मध्ये दाखल केलेल्या रिट याचिकेत उच्च न्यायालयाने उद्यानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी दिलेल्या आदेशांचे …
Read More »मुंबई, देवळाली, अहिल्यानगर, पिंपरीतील कार्यकर्त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश उबाठा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख नमिता नाईक यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच उबाठा गटाचे दहिसर शाखा क्रमांक ७ चे शाखाप्रमुख अक्षय राऊत आणि युवासेना दहिसर विधानसभा चिटणीस नरेंद्र …
Read More »एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर मुंबई मनपा कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांनाही ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेतील.. १. महानगरपालिका अधिकारी / …
Read More »
Marathi e-Batmya