Tag Archives: मुंबई महापालिका

रामदास आठवले यांची मागणी, महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्या जागा वाटपातील चर्चेत झालेली रिपब्लिकन पक्षाची नाराजी मुख्यमंत्र्याकडे आठवले मांडणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्यात. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलाविले नाही आणि चर्चेत सहभागी करुन घेतले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उद्या मांडणार आहोत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापुर्वी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडुन …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा विश्वास, मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची विजयी पताका फडकवू मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबईच्या प्रश्नावर लढणार

मुंबई महानगरपालिका निवडणूकीची घोषणा झाली असून काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी तयार आहे. महानगरपालिकेत भाजपा महायुतीने प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला आहे. लाडके कंत्राटदार व लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकली जात आहे. मुंबईच्या विकासासाठी व मुंबईकरांच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढवून काँग्रेस विजयी पताका फडकवेल, असा निर्धार मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार …

Read More »

छट पूजा स्थळांवर अपुऱ्या सुविधांबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब सुविधा उपलब्ध करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले निर्देश

मुंबई परिसरात येत्या २७ आणि २८ ऑक्टोबर दरम्यान छट पूजा उत्सव होणार असून निश्चित केलेल्या पूजा स्थळांवर अपुऱ्या सुविधांबाबत मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असून त्वरित आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित …

Read More »

छट पूजेदरम्यान मुंबई महापालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध; मेट्रो आणि बेस्ट सेवा उशिरापर्यंत सुरु राहणार मंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई परिसरात छट पूजा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून, यादरम्यान महापालिकेकडून विविध सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच उत्सवादरम्यान शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे. महापालिका मुख्यालयात मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी छट पूजेच्या तयारीचा आढावा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतीलपालिकेची रुग्णालये व्हेंटिलेटरवर, ७ हजार कोटींचा आरोग्य निधी जातो कुठे ? विलेपार्लेच्या आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट , रुग्णांसाठी मुलभूत सुविधा, औषधे व कर्मचा-यांचा तुटवडा

भाजपा महायुती सरकार व मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणे हे सरकार आणि महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी असताना, मुंबईत अनेक महापालिका रुग्णालये सुविधांअभावी अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. गरीब कुटुंबांतील रुग्णांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेचा तब्बल ७ हजार कोटींचा आरोग्य विभागाचा निधी नक्की जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा विश्वास, मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार एकनाथ शिंदे यांनी साधला शाखाप्रमुखांशी संवाद

महापालिका निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा लढवण्यासाठी मिळणार हे महत्त्वाचे नसून मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकवणे हे आमचे ध्येय असल्याचे सांगत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजले आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुंबईतील शाखाप्रमुखांच्या …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, आता नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर अर्ध्या तासात… तब्बल ५ वर्षाच्या पाठपुरावाला यश

केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला असून येत्या ३ वर्षात हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मिरा- भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, आरोग्य विभागाचा ७ हजार कोटींचा निधी जातो कुठे ? नालेसफाईत हातसफाई, मिठी नदीत अजून गाळ तसाच, मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा यंदाही मुंबईत मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी एसीबी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, …

Read More »

रेल्वेच्या जमिनीवर ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी बसविल्या? पालिकेकडे माहिती नाहीः मध्य आणि पश्चिम रेल्वेत होर्डिंग्ज माफिया

मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती …

Read More »