Tag Archives: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १०० टक्के शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज अवादाच्या ११सौर प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत (एमएसकेव्हीवाय) २०२६ पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. अवादा ग्रुप या वैविध्यपूर्ण ऊर्जा समुहाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात ११ सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे. ‘साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू‌. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे ३३५ कोटी रु.च्या विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल

आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात 1 लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र-आयोवा भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये नवी दारे खुली गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार

महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोवाबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारानंतर केले. सामंजस्य करारामुळे नवोपक्रमांना चालना अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचे ‘फूड बास्केट’ म्हणून प्रसिद्ध असून …

Read More »

टाटा टेक्नॉलॉजी आणि शासन यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंज्यस करार दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधा

टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र (सीआयआयटी) सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे प्रकल्प प्रमुख सुशीलकुमार व महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. रामगिरी येथे नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खासगी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले पाच कंपन्यांसोबत १ लाख ८ हजार कोटींचे साम्यंजस्य करार राज्याच्या आर्थिक प्रगतीत उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा

राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्राच्या व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्यशासन नेहमीच प्रयत्नशील असून उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील विविध ठिकाणी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध

महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. ‘इज ऑफ ड्युईंग बिझनेस’ अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स (आयएबीसीए) ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि सीईओंसोबत राऊंटटेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणा तातडीने अंमलात आणाव्यात महाराष्ट्र इनोव्हेशन सिटीच्या पायाभरणीसाठी कार्यवाहीचे निर्देश

राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणांसाठी आलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच स्टार्टअप्सच्या मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. इतर राज्यांमध्ये स्टार्टअप वाढीसाठी प्रयत्न होत असताना महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी कायम राखली पाहिजे. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारणीसाठी गतीने कार्यवाही करून पायाभरणी लवकरच करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व …

Read More »

आमदार रईस शेख यांचा आरोप, भिवंडीत बेकायदा गोदामांच्या संख्येत बेसुमार वाढ एमएमआरडीए, एमआयडीसी किंवा स्थानिक महानगरपालिकेकडून प्रकल्पांना मंजुरी मिळावी, आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र

आशियातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक्स हबपैकी एक असलेल्या भिवंडी येथील औद्योगिक गोदाम प्रकल्पांना मंजुरी आणि रेरा नोंदणीची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत विकासाचे सुलभीकरण आणि लघु व मध्यम गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी गोदाम प्रकल्पांना नियम अत्यावश्यक असल्याचा दावाही यावेळी केला. …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयात स्पष्टता आणा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा  प्रमाणपत्र देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ शकतो …

Read More »