मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १०० टक्के शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज अवादाच्या ११सौर प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत (एमएसकेव्हीवाय) २०२६ पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. अवादा ग्रुप या वैविध्यपूर्ण ऊर्जा समुहाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात ११ सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली, यात यवतमाळ जिल्ह्याने ३५ मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना दिवसा मिळणार आहे. पण २०२६ पर्यंत जिल्ह्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे” असे यावेळी त्यांनी सांगितले.

याबाबत अवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल म्हणाले की, “या परिवर्तनात्मक प्रवासात महाराष्ट्र सरकारसोबत भागीदारी करणे हा आमचा सन्मान आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हे स्वच्छ ऊर्जा थेट ग्रामीण समुदायांचे उत्थान कशाप्रकारे करू शकते याचे एक मॉडेल म्हणावे लागेल. हे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह सौर ऊर्जा घेऊन आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण विकास आणि भारताच्या हरित ऊर्जा अभियानात योगदान देत आहे. हा.माध्यमातून १६७ गावांमधील १४,८९३ शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.”

About Editor

Check Also

योगेश कदम यांची माहिती, पोलीस कोठडीतील आरोपी पळून जाऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ससून रूग्णालयात पोलिस चौकीची स्थापना

पाचगणी पोलीस स्टेशन येथे पोक्सो अन्वये दाखल गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *