मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित …
Read More »आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‘वॉर रूम’ची स्थापना कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वॉरची स्थापना
राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात येत आहे. ही वॉर रूम’ मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार असून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ विकसित भारताचे स्वप्न साकारणार विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीची बैठक संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजे २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विकसित महाराष्ट्र २०४७ सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केला. या बैठकीत विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला सल्लागार समितीने …
Read More »अयोध्येतील दिवाळीच्या दिपोत्सवाची दोन गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे प्रमाणपत्रे
भगवान रामाचे शहर अयोध्या, मातीच्या दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने उजळले आणि पुन्हा एकदा इतिहास रचला, रविवारी छोटी दिवाळीनिमित्त २६ लाखांहून अधिक दिव्यांच्या नदीत पवित्र शहराला स्नान घालून आणि या प्रक्रियेत दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रमाणपत्रे मिळाली. हा विक्रम अयोध्येतील सरयू नदीच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच
देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यासंदर्भात बोलताना काँग्रेस …
Read More »गुजरात राज्य मंत्रिमंडळात २१ नव्या-जून्या मंत्र्यांनी घेतली आज शपथ काल २१ मंत्र्यांनी दिला होता राजीनामे आज नव्या-जून्या मंत्र्यांनी शपथ घेतली
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या नवनिर्मित मंत्रिमंडळात शुक्रवारी (१७ ऑक्टोबर २०२५) एकूण २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) मुख्यमंत्री वगळता राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर हे मंत्रिमंडळ आले. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी शपथविधीला उपस्थिती लावली. नवीन २१ मंत्र्यांच्या शपथविधीसह, मुख्यमंत्र्यांसह …
Read More »राजनाथ सिंह यांचा विश्वास, कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ भारताची उभारणी होणार सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा सहावा पदवीदान समारंभ
आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासन देखील कौशल्य …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, झोपडपट्टीवासी रहिवाशांचे स्वप्न दोन वर्षात पूर्ण करणार समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सर्व सोयी सुविधांयुक्त सुंदर घर
समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर व सर्व सुविधायुक्त असे घर मोफत देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे. कुणालाही विकास आणि घरापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न …
Read More »द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी स्वतंत्र योजना पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला अभिवादन म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीअंतर्गत विविध शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याकरिता स्वतंत्र योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या योजनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नऊ …
Read More »महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती
राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत बांबू उत्पादनात महाराष्ट्राचे स्थान आणखी बळकट करण्यात येणार आहे. राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी …
Read More »
Marathi e-Batmya