महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबत दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत. इंदू …
Read More »मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सला सहकार्य बिल गेट्स यांची ग्वाही; लखपती दीदी उपक्रमातही सहभाग
राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेवून महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या ग्रीनफिल्ड़ महामार्गाला मंजूरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने सहा पदरी, प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड हाय-स्पीड राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. ४,५००.६२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प जेएनपीए बंदर (पागोट) ते महाराष्ट्रातील चौक यांना जोडेल आणि बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) मोड अंतर्गत विकसित …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रात महिलांविरोधातील गुन्ह्यात वाढ गुन्ह्यात महाराष्ट्र ८ व्या स्थानी तर नागपूर पहिल्या टॉप १० मध्ये
मागील काही वर्षात राज्यातील गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर सर्वाधिक गुन्हे हे महिलांवरील अत्याचाराचे, विनयभंगाचे असल्याची कबुली दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत देशात महाराष्ट्रातील गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार आठव्या स्थानावर आहे. तर पहिल्या १० शहरांमध्ये नागपूरचा समावेश आहे. तर मुंबई १५ व्या स्थानी तर पुणे १८ व्या स्थानावर असल्याची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शासकिय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीया वापराबाबत नवे नियम समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियमात बदल करणार
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम तयार करताना तेव्हा सोशल मीडिया अस्तित्वात नसल्याने त्यात समाज माध्यमे वापरासंदर्भात कोणताही उल्लेख नव्हता. बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पुढील तीन महिन्यात या नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाजमाध्यमांच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करणार भाजपाच्या प्रविण दरेकर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
भविष्यातील प्रकल्पांसाठी तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. कोकण रेल्वे महामंडळांदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकण रेल्वे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केली घोषणा
नियमानुसार देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा दुपटीने व्याज देणाऱ्या योजनांच्या जाहिराती, भरमसाठ व्याजाच्या योजनांचे आमिष दाखवून पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आता ‘ फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट’ ची स्थापना करण्यात येईल. या युनिटच्या माध्यमातून अशा योजना जाहिरातींची माहिती घेऊन ठेवीदारांची फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, …माफी मागण्याचा प्रश्नच नाही! सरकारचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला औरंगजेबाची कबर आठवते का?
फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. दुसऱ्याचे घर पेटवायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्यावे की तुमचे घर पेटले आहे. औरंगजेबाची कबर यांना का आठवत आहे? कारण सरकारचे अपयश लपण्यासाठी हे सगळे सुरू आहे. लाडकी बहीण, महिला अत्याचार, …
Read More »नागपूरप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस निवेदन करताना म्हणाले, छावा चित्रपटाने खरा इतिहास बाहेर आणला पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करणार, विश्व हिंदू परिषद- बजरंग दलाने औरंगजेब कबरवरून आंदोलन
काल रात्री उशीराने नागपूरातील महाल परिसरात निर्माण झालेल्या दगडफेक, वाहने जाळण्याची घटना घडली. नागपूर शहर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच महाल परिसरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालयही आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भाजपाचा म्हणून ओळखला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून औरंगजेब …
Read More »भिवडींत शिवाजी महाराज यांच्या पहिल्या मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद अन् प्रेरणादायी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडे पाडा, ता.भिवंडी …
Read More »
Marathi e-Batmya